कोरोनाचा 'फासा' घट्ट आवळत असताना ब्राझीलनं घेतला हा निर्णय

टीम ई-सकाळ
Monday, 8 June 2020

ब्राझीलमधील वाढत्या आकड्यानंतर येथील सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. देशातील मृतांचा आकडा सरकारने आपल्या वेबसाइटवरुन हटवला असून तूर्तास मृतांच्या आकड्यासंदर्भात अधिकृत माहिती जाहीर करणार नसल्याची भूमिका ब्राझीलच्या सरकारने घेतली आहे. 

ब्रासिलिया : जगभरात वेगाने संक्रमण होत असलेल्या कोरोना विषाणूने अनेक देशांना हैराण केले आहे. देशातील वाढता आकडा रोखण्यासाठी त्या त्या देशातील सरकार आणि प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करताना दिसत आहे. अमेरिकेच्या पाठोपाठ आता कोरोनाग्रस्तांच्या सर्वाधिक प्रभावी देशाच्या यादीत ब्राझील दुसऱ्या स्थानावर पोहचले आहेत. ब्राझीलमधील वाढत्या आकड्यानंतर येथील सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. देशातील मृतांचा आकडा सरकारने आपल्या वेबसाइटवरुन हटवला असून तूर्तास मृतांच्या आकड्यासंदर्भात अधिकृत माहिती जाहीर करणार नसल्याची भूमिका ब्राझीलच्या सरकारने घेतली आहे. 

कधी आणि कुठे सापडला कोरोनाचा पहिला रुग्ण, चीनने दिली सविस्तर माहिती

ब्राझीलमधील स्थानिक प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, कोरोनाजन्य संकटाचा सामना करण्यात अपयशी ठरल्याची टिका राष्ट्रपती जायर बोलसोनारो यांच्यावर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालय आता केऴल मागील 24 तासांत कोरोना परिस्थितीचा आढावा देणार आहे. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आणि मृतांचा आकडा सरकारी वेबसाइटवरुन हटवण्यात आला आहे. ब्राझीलमध्ये सलग चौथ्या दिवशी एका दिवसांत कोरोनामुळे जवळपास हजाराच्यावर नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. इटलीनंतर अमेरिका आणि त्यानंतर आता ब्राझील हा कोरोनाचा केंद्रबिंदू ठरताना दिसत आहे. जगातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांच्या यादीत ब्राझील दुसऱ्या स्थानावर पोहचले आहे.  

देशातील परिस्थितीती चिंताजनक नाही, पण....

अमेरिका आणि ब्रिटननंतर सर्वाधिक मृतदर हा ब्राझीलमध्ये आहे. याठिकाणी प्रत्येक मिनिटाला एक नागरिक कोरोनामुळे आपला जीव गमावत आहे. लॅटिन अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या ब्राझील आणि मॅक्सिकोमध्ये कोरोना विषाणूचे वेगाने संक्रमण होत असल्याचे चित्र आहे. चीनच्या वुहानमध्ये 10 जानेवारी रोजी कोरोना विषाणूचा पहिला बळी गेला. त्यानंतर एप्रिलच्या सुरुवातीलाच जगभरातील मृतांचा आकडा हा लाखाच्या घरात पोहचल्याचे पाहायला मिळाले होते.  

हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या रिसर्च पेपरमध्ये घोटाळा; WHO ने सुद्धा भूमिका बदलली

ब्राझीलमध्ये 23 दिवसांमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा तीन लाखावरुन चार लाख झाल्याचे पाहायला मिळाले होते. ब्राझीलमध्ये 6.77 लाखहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून  36 हजारहून अधिक लोकांना या महा साथीच्या रोगामुळे आपला जीव गमावला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांमध्ये 30 टक्के म्हणजे जवळपास 20 लाख कोरोनाग्रस्त हे अमेरिकेत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus brazil stops publishing running total of covid 19 deaths