esakal | चीनच्या लॅबवर संशय बळावला; ब्रिटनने व्यक्त केली शंका!
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus british minister china lab leak virus theory

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली कोब्रा कमिटी स्थापन केलीय.

चीनच्या लॅबवर संशय बळावला; ब्रिटनने व्यक्त केली शंका!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

लंडन Coronavirus:चीनच्या हुबेई प्रांतात कोरोना व्हायरसची लागण काय होते. तो हुबेई प्रांताबरोबच जगभर पसतो काय! आज जगभर कोरोनाचा फैलाव झालेला आहे आणि अर्थातच चीन संशयाच्या भोवऱ्यात आहे. हा व्हायरस चीनने तयार करून, जगभर पसरवला, इतका मोठा आरोपही केला जातोय. त्याला कोणताही सबळ पुरावा नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधल्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आणि मृतांच्या आकडेवारीवर शंका उपस्थित केली होती. आता ब्रिटनकडून चीनमधील वुहान शहरातील लॅबवर शंका उपस्थित करण्यात आलीय. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय घडले?
कोरोना व्हायरसचा उद्रेक कसा झाला, याविषयी अनेक शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. आतापर्यंत शास्त्रज्ञांनी हा व्हायरस जनावरांमधून, माणसाच्या शरिरात शिरल्याचा तर्क मान्य केलाय. पण, ब्रिटनकडून यावर शंका उपस्थित करण्यात आलीय. चीनने खरच हा व्हायरस लॅबमध्ये तयार केला का? याची माहिती घेण्यासाठी अनेक देशांनी आपल्या गुप्तचर खात्याला सक्रीय केलंय. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली कोब्रा कमिटी स्थापन केलीय. या कमिटीमधील एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार चीनच्या प्रयोगशाळेतून हा व्हायरस लीक झाल्याची शक्यता मान्य करण्यात येत आहे. हा व्हायरस प्राणीजन्य अर्थात प्राण्यांमध्ये सुरुवातील आढळलेला असू शकतो किंवा तो प्रयोग शाळेतूनही पसरवला गेला असू शकतो, अशा दोन्ही शक्यता मान्य करण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा - अंडरवेअरपासून बनवलेले मास्क पाकिस्तानच्या गळ्यात

इतिहास काय सांगतो?
चीनचा यापूर्वीचा इतिहास, सत्य लपवून ठेवण्याची सवय आणि ज्या शहरातून व्हायरसची लागण होण्यास सुरुवात झाली ते वुहान शहर, अशा सगळ्याची पार्श्वभूमी जोडल्यानंतर चीन विरोधात आंतररा्ट्रीय पातळीवर संशय बळावत चाललाय. 2004मध्ये सार्स हा व्हायरसही चीनच्या एका लॅबमधून लीक झाला होता. या संदर्भात ब्रिटनमधील द सन आणि डेली मेल या आघाडीच्या वृत्तपत्रांनी त्यांच्या वेबसाईटवर बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. 

आणखी वाचा - म्हणून, ट्रम्प यांनी मागितली नरेंद्र मोदींकडे मदत 

वुहान शहरच का?
कोरोना हे चीनचं जैविक शस्त्र असल्याचा आरोप केला जात आहे. पण, त्या संदर्भात कोणताही सबळ पुरावा नाही. व्हायरस वुहान शहरातूनच कसा पसरला? वुहान शहराची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर, शंकेची पाल चुकचुकते. मुळात वुहान शहर हे चीनमधील विषाणूशास्त्र संस्थेचे माहेरघर मानले जाते. त्या शहरात अतिशय उच्च दर्जाची अत्याधुनिक लॅब आहे. ज्या सीफूड मार्केटमधून वटवाघुळामार्फत कोरोना व्हायरस पसरल्याचा दावा केला जातो. ते मार्केट इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीपासून अतिशय जवळ आहे. चीनच्याच पिपल्स डेली या वृत्तपत्राने 2018मध्ये या लॅब संदर्भात एक लेख प्रसिद्ध केला होता. त्यात या लॅबमध्ये अतिउच्च दर्जाचे प्रयोग केले जाऊ शकतात, असे म्हटले होते. वुहान शहरातील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेची लॅबही मार्केटपासून थोड्या अंतरावर आहे. त्या लॅबमध्येही प्राण्यांवर प्रयोग करण्यात येतात. 

loading image
go to top