esakal | Coronavirus : पाकिस्तानपुढे मोठे संकट; डॉक्टरांनी बंद केले काम
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus crisis in pakistan doctors boycott work

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलेले असताना आपले शेजारी राष्ट्र पाकिस्तानही यातून सुटू शकलेले नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक दिग्गज देश मेटाकुटीला आले आहेत. अशातच पाकिस्तानची अवस्था तर आणखीनच खूपच बिकट झाली आहे. पाकिस्तानमधील डॉक्टरांच्या एका संघटनेने बहिष्कार टाकत सेवा बंद केल्याने पाकिस्तानसमोरील कोरोनाचे संकट आणखी गडद झाले आहे.

Coronavirus : पाकिस्तानपुढे मोठे संकट; डॉक्टरांनी बंद केले काम

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लाहोर : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलेले असताना आपले शेजारी राष्ट्र पाकिस्तानही यातून सुटू शकलेले नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक दिग्गज देश मेटाकुटीला आले आहेत. अशातच पाकिस्तानची अवस्था तर आणखीनच खूपच बिकट झाली आहे. पाकिस्तानमधील डॉक्टरांच्या एका संघटनेने बहिष्कार टाकत सेवा बंद केल्याने पाकिस्तानसमोरील कोरोनाचे संकट आणखी गडद झाले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना व्हायरसच्या संसर्गाविरोधात लढणाऱ्या डॉक्टरांवर पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये लाठीचार्ज करण्यात आला. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सेफ्टी किट सर्व डॉक्टरांना देण्यात यावी अशी मागणी करण्यासाठी युवा डॉक्टर आणि पॅरा मेडिकल कर्मचाऱ्यांनी क्वेटामध्ये आंदोलन केले. मात्र, या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्जच्या निषेधार्थ 'यंग डॉक्टर्स असोसिएशन'ने रुग्णालयातील सेवेवर बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.

चिंताजनक : इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आयसीयूत दाखल

देशाची आर्थिक स्थिती लक्षात घेता लॉकडाऊन करणं शक्य नाही, असा निर्णय पाकिस्तानेच पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतला होता. त्यानंतर कोरोनाचा फैलाव पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर झाला. त्यातच आता डॉक्टरांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानची परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

Coronavirus : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ८६८; आतापर्यंत तपासले एवढे नमुने

दरम्यान, पाकिस्तानमध्ये आतापर्यंत एकूण ३७६६ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर, त्यापैकी ५३ रुग्णांचा मृत्यू झाला असून २५९ रुग्नांना बरे झाल्यावर डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे. तर सध्या पाकिस्तानमध्ये ३४५३ रुग्ण हे रुग्णालायमध्ये आहेत. त्यापैकी १७ रुग्ण हे गंभीर असल्याची माहिती आहे. 

loading image
go to top