esakal | यूरोपात इंग्लडमध्ये कोरोना काळात सर्वाधिक मृत्यूची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

Corona_23_0.jpg

कोरोना महामारीच्या काळात युरोपातील देशांपैकी इंग्लडमध्ये सर्वाधिक मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

यूरोपात इंग्लडमध्ये कोरोना काळात सर्वाधिक मृत्यूची नोंद

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

लंडन- कोरोना महामारीच्या काळात युरोपातील देशांपैकी इंग्लडमध्ये सर्वाधिक मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. फेब्रुवारी ते जूनपर्यंत इंग्लडमध्ये 51,454 लोकांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने  याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. इंग्लंडनंतर स्पेनमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. देशात जूनपर्यंत 44 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेले आणि वेळेवर उपचार न मिळणारे अशा दोघांची संख्या ग्रहित धरण्यात आली आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका पुढे ढकललेल्या बऱ्या- डोनाल्ड ट्रम्प
युरोपातील सर्व देशांपेक्षा इंग्लडमधील कोरोनाचा प्रचार व्यापक होता. मे महिन्यात इंग्लडमध्ये सर्वाधिक 7.5 टक्के मृत्यूदर नोंदला गेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर स्पेन असून मृत्यूदर 6.7 टक्के नोंदला गेला आहे. त्यांनतर तिसरा क्रमांक स्कॉटलँडचा असून त्याचा मृत्यूदर 5.1 टक्के आहे.

स्पेनने मृत्यूदराबाबतीत शिखर गाठला होता. मात्र, त्यानंतर देशाने मृत्यूदर बऱ्यापैकी नियंत्रणात आणला. त्यामुळे कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीतून स्पेन लवकरच बाहेर आला आहे.  ब्रिटनने शिखर गाठला नसला तरी अधिक काळासाठी तेथे सरासरी जास्त मृत्यू पाहायला मिळाले आहेत. स्पेन आणि इटलीमधील मिलान आणि मॅड्रिड सारखी शहरे इंग्लडमधील शहरांपेक्षा जास्त प्रभावीत झाली आहेत. वेल्स आणि नॉर्थ आयर्लंड हे देशही सर्वाधिक प्रभावित देश ठरले आहेत. 

भारत-चीन सीमेवर पुन्हा तणाव; भारतानं सुरू केली तयारी
इंग्लडचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी कोरोना विषाणूमुळे मृत्यू पावलेल्या लोकांबाबत दु:ख व्यक्त केले आहे. कोरोना विषाणूला हरवण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत. शिवाय गेल्या काही दिवसांत मृत्यूदर कमी करण्यास आपणास चांगले यश मिळाले आहे, असं जॉनसन म्हणाले आहेत. 

इंग्लडमध्ये यापूर्वी ताप, सर्दी किंवा खोकला असणाऱ्यांना एक आठवड्यासाठी विलगीकरणात राहण्यास सांगितले होते. मात्र, आता कोरोनासदृष्य लक्षणे दिसत असल्याच व्यक्तीला 10 दिवस विगलीकरणात राहावं लागणार आहे. यूकेमध्ये आतापर्यंत 3 लाख 6 हजार लोकांचा कोरोनाची बाधा झाली आहे. मार्च-एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक होते. जून महिन्यांपासून मृत्यूदर कमी झाला आहे. मात्र, देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट येण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.