शारीरिक संबंधातून कोरोना संक्रमण होऊ शकते? चीनमध्ये सुरुय संशोधन

coronavirus, semen, coronavirus study, china
coronavirus, semen, coronavirus study, china
Updated on

बिजिंग : Coronavirus: जगभरात वेगाने होणाऱ्या कोरोना विषाणूचे संक्रमण शारीरिक संबंधातून होते का? याचा अभ्यास चीनमधील शास्त्रज्ञ करत आहेत. पुरुषांच्या वीर्यामध्ये कोरोना विषाणू आढळल्याचा दावा चीनी शास्त्रज्ञांनी केला असून कोरोना विषाणू शारीरिक संबंधातून संक्रमित होऊ शकतो याबाबत अद्याप  ठोस मा निष्कर्ष काढता येणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. जेएएमए नेटवर्क ओपन मेडिकल जरनलमध्ये या संदर्भातील माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

चीनमधील एका रुग्णालयातील कोरोनाग्रस्तांच्या अभ्यासानंतर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा श्वसन, लाळ यासोबतच मूत्राच्या माध्यमातून होऊ शकतो, असे समोर आले आहे. चीनच्या हेनान प्रांतातील शांगकिउ महानगर पालिकेतील रुग्णालयातील वैज्ञानिकांनी कोरोनाचा विषाणू वीर्यामध्ये असतो की नाही याबबत संशोधन केले. यासाठी 15 ते 50 वयोगटातील 38 कोरोनाग्रस्तांचा वीर्याची तपासणी करण्यात आली.  यातील ६ रुग्णांच्या वीर्यामध्ये कोरोनाचा विषाणू असल्याचे दिसून आले. यातील चार रुग्ण गंभीर होते तर दोन रुग्णांची प्रकृती स्थिरावत होती.  

या अभ्यासासाठी घेतलेले नमुने मर्यादित आणि अल्प होते. त्यामुळे शारीरिक संबंधातून कोरोनाचे संक्रमण होते का? यासंदर्भात ठोस निष्कर्ष काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात नमुने घेऊन अध्ययन करण्याची आवश्यकता आहे, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. भविष्यातील अभ्यासातून कोरोना विषाणू शारीरिक संबंधामुळे संक्रमित होतो हे समोर आले तर त्याला रोखण्यासाठी रुग्णांना संयम बाळगणे तसेच शारीरिक संबंधावेळी कंडोमचा वापर करुन संक्रमण रोखणं या मार्गाचा अवलंब करावा लागेल, असा उल्लेखही अहवालात करण्यात आला आहे.  

कोरोना विषाणूने जगभर थैमान घातलं असून 38 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. दिवसागणिक या आकड्यात वाढ होत असून मृतांता आकडाही लाखाच्या घरात आहे. सुरुवातीच्या काळात  खोकला, ताप आणि श्वसनाचा त्रास ही  तीन लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींची करोनाची चाचणी केली जात होती. यासंदर्भात सुरु असलेल्या संशोधनातून राहून राहून थंडी वाजणे, सर्दी, स्नायूदुखी, डोकेदुखी, चव न कळणे ही देखील कोरोनाची लक्षण असू शकतात, असे समोर आले होते.  
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com