कोरोना व्हायरसमुळं बिअरचं काय झालं? सोशल मीडियावर अफवा

टीम ई-सकाळ
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

कोरोना नावाचा एक बिअर ब्रँड जगभरात प्रसिद्ध आहे. कोरोना एक्स्ट्रा ही बिअर लोकप्रिय आहे. मध्य अमेरिकेतील मेक्सिको या देशात कोरोना बिअरचं अत्पादन होतं.

नवी दिल्ली Corona Extra : कोरोना व्हायरसचा धसका जगानं घेतलाय. भारतात चिकनमुळं कोरोना व्हायरस होत असल्याची अफवा पसरल्यामुळं चिकनचा खप कमी झालाय. कोरोना व्हायरस आणि चिकनचा काही संबंध नसल्याचं सरकारला सांगावं लागतंय. तर दुसरीकडं कोरोनो नावाच्या बिअरचा खप मात्र वाढतच आहे. कंपनीने बिअरच्या खपात कोणताही परिणाम झाला नसल्याचं स्पष्ट केलंय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोना नावाचा एक बिअर ब्रँड जगभरात प्रसिद्ध आहे. कोरोना एक्स्ट्रा ही बिअर लोकप्रिय आहे. मध्य अमेरिकेतील मेक्सिको या देशात कोरोना बिअरचं अत्पादन होतं. चीनमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव झाल्यानंतर कोरोना बिअरच्या खपावर परिणाम होईल, अशी शक्यता वाटत होती. पण, कोरोनाच्या खपात कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती खुद्द कंपनीनेच दिली आहे. कोरोनाचा बिअरच्या खपावर कोणताही निगेटिव्ह परिणाम झाला नसल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. सध्या बिअरच्या खपाचा आलेख चढाच असल्याचं कंपनीनं सांगितलं.

आणखी वाचा - बाप रे सोन्याचा दर लाखाच्या घरात?

आणखी वाचा - मंत्र्यांनी स्टेजवरच मारला चिकनवर ताव 

कोरोना बिअरच्या निर्यातीमध्ये पाच टक्क्यांनी वाढ झालीय. 16 फेब्रुवारी रोजी संपलेल्या चार आठवड्यांच्या आकडेवारीनुसार, 52 आठवड्यांपेक्षा दुप्पट दिसत आहे. किंबहुना, कोरोना व्हायरसमुळं बिअरच्या लोकप्रियतेत वाढ झाली. ज्यांना ही बिअर माहिती नव्हती. त्यांनीही या बिअरची चव घेतल्याचं सांगितलं जातंय. या संदर्भात कंपनीने म्हटले आहे की, आमच्या बिअर बिझनेसला सपोर्ट करणाऱ्या सगळ्या युनिट्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, चालू कॅलेंडर वर्षात सगळीकडे सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कोरोना व्हायरसमुळं बिअरच्या उत्पादनात घट झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत होता. त्यावर कंपनीनं खुलासा केलाय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact on corona extra beer worldwide