पाक दहशतीत; इमरान खान यांना सतावतेय या गोष्टीची भीती

टीम ई-सकाळ
Tuesday, 9 June 2020

त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. असे आवाहन इमरान खान यांनी देशवासियांना केले आहे. जूलै-ऑगस्ट हे दोन महिने पाकिस्तानसाठी कसोटीचे असतील, असे संकेतही त्यांनी दिले.

इस्लामाबाद : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूची पाकिस्तानमध्ये दहशत वाढतानाचे चित्र आहे. पाकिस्तामधील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा एक लाखाहून अधिक झाला आहे. जूलै-ऑगस्टमध्ये देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकड्याने 1 लाखाचा टप्पा पार केला आहे. आगामी दिवसात हा आकडा आणखी वाढू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. असे आवाहन इमरान खान यांनी देशवासियांना केले आहे. जूलै-ऑगस्ट हे दोन महिने पाकिस्तानसाठी कसोटीचे असतील, असे संकेतही त्यांनी दिले.

हा देश झाला कोरोनामुक्त; कोणता ते वाचा

पाकिस्तानमध्ये दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनचा निर्णय घेण्यात येणार नाही, असे इमरान खान यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. लॉकडाउनचा निर्णय न घेता आवश्यक ती खबरादीर घेऊन आगामी संकटाला थोपवण्याची रणनिती पाकिस्तान आखत असल्याचे दिसते. देशवासियांना संबोधित करताना  इमरान खान म्हणाले की, देशात कोरोना विषाणूचे संक्रमणाचा चढउतार कायम राहण्याचा अंदाज आरोग्य विभागाशी निगडीत अभ्यासकांनी वर्तवला आहे. जूलै-ऑगस्टमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आकडा झपाट्याने वाढू शकतो. हा ग्राफ पुन्ही कमी होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. भविष्यातील संकटाचा सामना करण्याची जबाबदारी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. स्वत:साठी, आपल्या प्रिय व्यक्तींसाठी आपल्याला आवश्यकती खबरदारी घ्यावीच लागेल.    
साधारण ताप असल्याचा विचार करुन अनेकजण नियमाच उल्लंघन करत आहे. या विचाराने तुम्ही स्वत:ची आणि आपल्या जवळच्या व्यक्तीचा जीव धोक्यात घालत आहात. याकडे दुर्लक्ष करु नका. कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी जी नियमावली तयार केली आहे. त्याचे पालन करा, अशी कळकळीची विनंती पाक वजीरे आजम इमकान खान यांनी देशवासियांना केली.   

कोरोनाला रोखणारे तैवानी मॉडेल

पाकिस्तानमध्ये वाढत्या कोरोनाग्रस्त रुग्णांमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी आणि विद्यमान रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. या दोन्ही नेत्यांवर उपचार सुरु आहेत.  राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पाकमध्ये आतापर्यंत 1,05,637 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. यात पंजाब प्रांतात 38,903 तर  सिंध प्रांतातील सर्वाधिक 39,555 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे पाकमध्ये आतापर्यंत 2,108 लोकांनी आपला जीव गमावला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus infection to peak in pakistan july and august pm imran khan