
जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. पाकिस्तानलाही त्याचा फटका बसला असून, कोविड १९ या शब्दाबाबत पाकिस्तानच्या पर्यावरण मंत्री जरताज गुल वजीर यांनी जावई शोध लावला असून, सोशल मीडियावर त्या ट्रोल झाल्या आहेत.
कराची: जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. पाकिस्तानलाही त्याचा फटका बसला असून, कोविड १९ या शब्दाबाबत पाकिस्तानच्या पर्यावरण मंत्री जरताज गुल वजीर यांनी जावई शोध लावला असून, सोशल मीडियावर त्या ट्रोल झाल्या आहेत.
भारताच्या कारवाईनंतर पाकचे सैनिक सुटले पळत...
मंत्री जरताज गुल वजीर या नेहमी आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. यावेळी जरताज गुल यांनी कोविड १९ बाबत वक्तव्य करून खिल्ली उडवली घेतली. त्यांना एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. मुलाखतीदरम्यान पत्रकाराने कोविड १९ बाबत प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना जरताज गुल म्हणाल्या, 'कोविड १९ चा अर्थ असा आहे की यात १९ पॉईंट्स असतात, जे कोणत्याही देशाला कशाही प्रकारे लागू होऊ शकतात.' संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्स त्यांची खिल्ली उडवत आहेत. एका मंत्र्याला कोविड १९ या शब्दाचा अर्थ माहित नसून, त्याचा त्यांनी नवीन जावई शोध लावल्याची टीका होत आहे.'
What ???? in Covid-19 actually means, minister Zartaj Gul's earthshaking discovery: pic.twitter.com/uNYjei3rT8
— Naila Inayat ????? ????? (@nailainayat) June 20, 2020
पाकिस्तानी पत्रकार नायला इनायत यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यात कोविड १९ मध्ये १९ याचा अर्थ काय आहे, याचा जमीन हादरवणारा शोध अशा शब्दात ट्विट करुन टोमणा मारला आहे. त्यावर अनेकांनी हे ट्विट लाईक्स आणि शेअर केले आहे. दरम्यान, कोविड -१९ म्हणजे कोरोनाव्हायरस रोग २०१९ कोविड -१९ मधील CO या शब्दाचा अर्थ कोरोना, VI विषाणूसाठी आणि रोगासाठी D आहे. यापूर्वी हा आजार २०१९ नोवल कोरोनाव्हायरस किंवा २०१९-एनसीओव्ही म्हणून ओळखला जात असे.