Video: पाकिस्तानच्या धर्मगुरुचा कोरोनाबाबत अजब दावा...

वृत्तसंस्था
Monday, 15 June 2020

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा फटका पाकिस्तानला सुद्धा बसला असून, येथील एक धर्मगुरुने कोरोनाबाबत अजब दावा केला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कराची (पाकिस्तान): जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा फटका पाकिस्तानला सुद्धा बसला असून, येथील एक धर्मगुरुने कोरोनाबाबत अजब दावा केला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाकिस्तानला धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल...

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये धर्मगुरुने म्हटले आहे की, 'डॉक्टर आपल्याला जास्तीत जास्त वेळ झोपण्याचा सल्ला देतात. आपण जेवढा वेळ झोपू तेवढा वेळ (कोरोना) विषाणूही झोपतो. आपण झोपलेलो असताना कोरोना आपल्याला त्रास देत नाही. आपण झोपतो तेव्हा तो ही झोपतो. आपण मरतो तेव्हा तो ही मरतो.' दरम्यान, पत्रकार नायला इनायत यांनी धर्मगुरुचा व्हिडिओ ट्विट केला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असन, नेटिझन्सनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून टीका केली आहे.

 

डोळ्यात पाणी आणणारा मैत्रिचा व्हिडिओ व्हायरल...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: when we sleep the corona virus sleeps too pakistan clerics video viral