esakal | Coronavirus : कोरोनाच्या भीतीने संपूर्ण शहरच झाले जगापासून वेगळे
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown

जगभरात कोरोना थैमान घालत असताना संपूर्ण जग लॉकडाऊन केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी स्वत:ला इतरांच्या संपर्कात येऊ न देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अशातच दक्षिण स्पेनमधील कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या पाहून धक्का बसलेल्या ‘जाहरा डे ला सीएरा’  शहराच्या महापौरांनी उर्वरित जगापासून पूर्ण शहरच वेगळे केले आहे.

Coronavirus : कोरोनाच्या भीतीने संपूर्ण शहरच झाले जगापासून वेगळे

sakal_logo
By
पीटीआय

कोरोनाच्या भीतीमुळे स्पेनच्या जाहरा डे ला सीएरा शहराने स्वत:ला जगापासून वेगळे केले आहे. स्पेनमध्ये कोरोना थैमान घालत असून, आतापर्यंत १ लाख १२ हजार पेक्षा जास्त लोकांना याचा संसर्ग झाला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगभरात कोरोना थैमान घालत असताना संपूर्ण जग लॉकडाऊन केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी स्वत:ला इतरांच्या संपर्कात येऊ न देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अशातच दक्षिण स्पेनमधील कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या पाहून धक्का बसलेल्या ‘जाहरा डे ला सीएरा’  शहराच्या महापौरांनी उर्वरित जगापासून पूर्ण शहरच वेगळे केले आहे. 14 मार्च रोजी ‘जाहरा डे ला सीएरा’ शहराचे प्रवेशद्वार बंद ठेवण्याचे निर्देश या महापौरांनी दिले आहेत. यामुळे येथे बाहेरील लोकांवर पूर्णपणे बंदी आहे. जाहरा डे ला सिएरा हे स्पेनच्या दक्षिण भागात वसलेले एक ऐतिहासिक शहर आहे.

आणखी वाचा - सोशल व्हायरसपासून सावधान, कोरोनापेक्षाही जास्त धोका

काय आहे शहराचा इतिहास
झाहारा डे ला सिएरा येथील किल्ल्याचा उपयोग शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी केला जात असे. मध्ययुगीन काळात, या किल्ल्यावर मार्स आणि ख्रिश्चन यांच्यात भयंकर युद्ध झाले होते. त्यानंतर हा किल्ला १८१२ मध्ये फ्रेंच सैन्याने जिंकला. सिएरा सिटीचे ४० वर्षीय महापौर सॅंटियागो गॅल्वेन यांनी कोरोना विषाणूमुळे उद्भवणार्यार परिस्थितीपासून शहराला वाचवण्यासाठी देशापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

जपाननं खूप उशीर केला; 91 जणांच्या मृत्यूनंतर घेतला निर्णय 
 
काय केले शहराने?
कोरोनाने स्पेनमध्ये थैमान घालत अनेक लोकांचा बळी घेतला आहे. अशातच स्पेनमध्ये ज्यादिवशी अलार्म ऑफ स्टेट (आणीबाणी) लागू करण्यात आला. त्याचदिवशी झाहारा डेला सिएरा या शहराच्या महापौरांनी शहराला जगापासून वेगळे करण्याचा निर्णय घेतला आणि शहराला जोडणारे पाचही रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले. यामुळे या शहरात कोणत्याही बाहेरील व्यक्तीस प्रवेश दिला जात नाही. महापौर सॅंटियागो गॅल्व्हिन म्हणाले, ‘गेल्या दोन आठवड्यांपासून त्याच्या शहरात कोरोना विषाणूच्या संक्रमणाची कोणतीही नोंद झालेली नाही. ही एक चांगली बाब आहे.

शहराला  उर्वरीत जगापासून वेगळे ठेवण्याच्या निर्णयाचे स्थानिकांनीही स्वागत केले आहे.’ नगराध्यक्ष म्हणाले की, या शहरात 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक आहेत. जर हा विषाणू या शहरात प्रवेश करत असेल तर मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू होऊ शकतो. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, स्पेनमधील कोरोना विषाणूचे आजपर्यंत १ लाख १२ हजार ६५हून अधिक संक्रमण झाले आहे. यापैकी १० हजार ३४८ लोक मरण पावले आहेत. त्याच वेळी, २ हजार ६४३ लोक कोरोनामुक्त झाले.

loading image
go to top