esakal | अमेरिकेनं स्ट्रॅटेजी बदलली, डोनाल्ड ट्रम्प यांनीच दिली माहिती!
sakal

बोलून बातमी शोधा

Donald-Trump

अमेरिकेत कोरोना मुळे होणाऱ्या हजारो मृत्यू दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी या देशाला आश्वासन दिले की संसर्गातून पसरणाऱ्या या रोगाला थांबविण्यासाठी अवलंबिण्यात आलेली नवीन आक्रमक रणनीती कार्यरत आहे आणि नवीन रुग्णांची संख्या स्थिर होईल, अशी चिन्हे आहेत.

अमेरिकेनं स्ट्रॅटेजी बदलली, डोनाल्ड ट्रम्प यांनीच दिली माहिती!

sakal_logo
By
पीटीआय

अमेरिकेत कोरोना मुळे होणाऱ्या हजारो मृत्यू दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी या देशाला आश्वासन दिले की संसर्गातून पसरणाऱ्या या रोगाला थांबविण्यासाठी अवलंबिण्यात आलेली नवीन आक्रमक रणनीती कार्यरत आहे आणि नवीन रुग्णांची संख्या स्थिर होईल, अशी चिन्हे आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'योग्य दिशेने जाऊ'
अमेरिकेतील कोरोनामुळे होणाऱ्या हजारो मृत्यूदरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी या देशाला आश्वासन दिले आहे की, संसर्गातून पसरणाऱ्या या रोगाला थांबविण्यासाठी अवलंबिण्यात आलेली नवीन आक्रमक रणनीती कार्यरत आहे आणि नवीन संक्रमणाची संख्या स्थिर होईल अशी चिन्हे आहेत. ट्रम्प व्हाईट हाऊसमधील कोरोना विषाणूविषयीच्या आपल्या दैनंदिन पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी , "रोज संख्या बदलत आहे आणि वेगाने बदलत आहे आणि लवकरच आपण या संकटातून मुक्त होऊ. आपण सर्वात आधी या संकटातून बाहेर पडून योग्य दिशेने जाऊ, याविषयी माझा अगदी ठाम विश्वास आहे.'' असे वक्तव्य केले आहे.

Coronavirus : जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १५लाखांवर तर, मृत्यूंचा आकडा...

न्यूयॉर्क, लुईझियानात थैमान
ट्रम्प म्हणाले, "या गंभीर संसर्गाच्या विषाणूमुळे झालेल्या भीषण मृत्यू तांडवाने आम्ही खूप  दु:खी आहोत, या कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी आमची नवीन आक्रमक रणनीती कार्यरत असल्याचे चिन्हे दिसत आहेत." नवीन प्रकरणांची संख्या सध्या अपेक्षेप्रमाणे स्थिर आहे. बऱ्याच ठिकाणी, आवश्यक असलेल्या बेडच्यासंख्येची मी माहिती घेतली आहे.” ट्रम्प या कोरोनाच्या भयावह परीस्थित त्यांच्या राष्ट्राला धीर देत तेथील एकूणच सर्व परिस्थितीचा आढावा सातत्याने घेत असल्याचे दिसत आहे. पत्रकारांशी बोलण्यापूर्वीच त्यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क, लुईझियानात या कोरोनाने प्रचंड थैमान घातलेल्या शहरांची स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेतली. ट्रम्प यांनी अमेरिकेतील जनतेला सध्या काही वाईट दिवस सुरू असून, लवकरच चांगले दिवस येतील, असा आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे.

Coronavirus : पाकिस्तानला तबलिगींचा मोठा फटका; २.५लाख लोक संपर्कात

एकट्या न्यूयॉर्कमध्ये दीड लाख रुग्ण
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील परिस्थिती विषयी माहिती देत असताना सध्या अमेरिकेत पसरलेल्या कोरोनाचा संसर्ग हि भयानक बाब असून लवकरच यातून अमेरिका बाहेर पडेल असे सांगितले. या काळात अनेकांनी आपल्या प्रिय व्यक्ती गमावल्याअसून ते हि घटना कधीही विसरू शकणार नाहीत असे ट्रम्प यांनी सांगितले आहे. दरम्यान बुधवारपर्यंत अमेरिकेत ४,३०,००० लोकांना कोरोनाची लागण झाली असून १४,७६० पेक्षा जास्त लोकांचा यात मृत्यू झालेला आहे. एकाच दिवसांत १९०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून एकट्या न्यूयॉर्क शहरात आतापर्यंत दीड लाखापेक्षा जास्त लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून यात ६२०० अधिक मृत्यूची प्रकरणे समोर आली आहेत.

loading image
go to top