
वाशिंग्टन : चीनच्या वुहान शहरातून जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या संसर्गजन्य रोगाला जागतिक महारोग घोषीत केल्यापासूनच अनेक देशातील शास्त्रज्ज्ञ यावरील प्रतिबंधात्मक लस शोधण्याची ( vaccine research )खटाटोप करत असल्याचे पाहायला मिळते. या महासाथीच्या रोगाला चीन (china) कारणीभूत असल्याचे आरोप करणाऱ्या अमेरिकेने चीनवर आणखी एक आरोप केलाय. चीनी हॅकर्स लसीच्या शोधासंदर्भातील डेटा चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
'द वॉल स्ट्रीट जर्नल' आणि न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेची तपास यंत्रणा असलेल्या फेडरल ब्यूरो ऑफ इनवेस्टिगेशन (FBI) आणि होमलँड सिक्योरिटी विभागने दावा केलाय की, चीनी हॅकर्स आणि गुप्तहेर कोरोना प्रतिबंधात्मक लसच्या संदर्भातील शोध डेटा चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. यासंदर्भात चीनच्या हॅकर्सना नोटीसीच्या माध्यमातून ताकीद देणार असल्याचेही या संस्थांनी म्हटले आहे.
डेटा चोरी करण्याच्या हेतूने हॅकर्स शोध मोहिमेत अडथळा निर्माण करत असून कोविड-19 चा उपचार आणि परीक्षण केंद्रवर सायबर हल्ला करत आहेत. मागील आठवड्यात एका संयुक्त संदेशात ब्रिटन आणि अमेरिकेने सायबर हल्ल्यात वाढ होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. पूर्वीच्या आरोपाप्रमाणेच चीनी अधिकाऱ्यांनी अमेरिकेने (America) केलेला हा आरोपही फेटाळून लावला आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिजियन म्हणाले की, आम्ही Covid-19 च्या उपचारासाठी आणि लस शोधण्यासाठी जगाचे प्रतिनिधीत्व करत आहोत. कोणत्याही पुराव्याशिवाय चीनसंदर्भात खोट्या बातम्या पसरवणे चुकीचे आहे. आणखी एक परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता हुआ चुनयिंग यांनी देखील चीनची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, आम्ही कोरोना विषाणू संक्रमणाची गोष्ट लपवल्याचा आरोप यापूर्वी अमेरिकेने केला होता. आम्ही वेळेत याविषयी माहिती न दिल्याचे त्यांनी म्हटले होते. पण यातही कोणतेच तथ्य नाही. आम्ही वारंवार आमच्या येथील परिस्थितीची माहिती जगाला दिली आहे. अमेरिका पुन्हा पुन्हा खोट्या अफवा पसरवण्याचे काम करत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.