गुड न्यूज : कोरोनाव्हायरस वरील लस दृष्टीपथात; भारतीय वैज्ञानिकाचं संशोधन 

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

ऑस्ट्रेलियातील एका लॅबमध्ये कोरोना व्हायरसवरील लस शोधण्यात यश आल्याचे दिसत आहे. या लसीची पहिली बॅच नोव्हल कोरोनाव्हायरस या नावाने तयार करण्यात आली आहे.

मेलबर्न : चीनमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसला रोखणारी लस अद्याप तयार नसल्यामुळं व्हायरसची लागण झालेल्यांचे एकापाठोपाठ एक बळी जात आहेत. दुसरीकडं या व्हायरसला रोखणारी लस शोधण्यात शास्त्रज्ञांना यश येत असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे, या शोधामध्ये भारतीय शास्त्रज्ञाचा मोलाचा वाट आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या संदर्भात टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, ऑस्ट्रेलियातील एका लॅबमध्ये कोरोना व्हायरसवरील लस शोधण्यात यश आल्याचे दिसत आहे. या लसीची पहिली बॅच नोव्हल कोरोनाव्हायरस या नावाने तयार करण्यात आली आहे. हा शोध लावण्यात प्रा. एस. एस. वासन या भारतीय शास्त्रज्ञाचा मोलाचा वाटा आहे. कॉमनवेल्थ सायन्टिफिक अँड इँडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेश (सीएआयआरओ) या संस्थेच्या लॅबमध्ये या लसीवर संशोधन सुरू आहे. संशोधकांना मानवी शरिरातून व्हायरसला काढून टाकण्यात यश आलंय. आता खऱ्याखुऱ्या व्हायरसवर याचा प्रयोग करण्यात येत आहे. जेणे करून आम्हा संशोधकांना कामाचा वेग वाढवता येईल, असं प्रा. वासन यांनी स्पष्ट केलंय. 

आणखी वाचा - कोरोनापासून जग वाचवण्यासाठी चीन सरकारचा मोठा निर्णय

ऑस्ट्रेलियातील अॅनिमल हेल्थ लॅबोरेटरीमधील माझ्या सहकाऱ्यांनी रोगाचे निदान, त्याचे निरीक्षण करणे आणि लसीला मिळणारा प्रतिसाद यावर बारीक संधोधन केले आहे. या लसीचा आणखी एक भाग क्विन्स लँड विद्यापीठामध्ये तयार करण्यात येत आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
प्रा. एस. एस. वासन, संशोधक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus vaccine successful research Australia Indian scientists