व्हायरल झालेल्या छायाचित्राचे खरे कारण घ्या जाणून...

वृत्तसंस्था
Thursday, 26 March 2020

सोशल मीडियावर डॉक्टर दाम्पत्याचे एक छायाचित्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण, खरे कारण काही वेगळेच आहे. कोरोना व्हायरसच्या अनेक अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत असल्याचे उघड होत आहे.

स्पेनः सोशल मीडियावर डॉक्टर दाम्पत्याचे एक छायाचित्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण, खरे कारण काही वेगळेच आहे. कोरोना व्हायरसच्या अनेक अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत असल्याचे उघड होत आहे.

Video: मोदींचे भाषण सुरू असताना त्याने पकडले कान...

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये या डॉक्टर दाम्पत्याच्या छायाचित्रासोबतच एक भावनिक पोस्ट शेअर केली जात आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'दोन डॉक्टर इटलीमधील आहेत. ते दोघेही दिवस-रात्र करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी काम करत आहेत. पण त्यांना आता करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्या दोघांना दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. पण त्यांना आपण करोनावर मात करु शकत नाही हे कळाताच ते दोघे रुग्णालयाच्या लॉजमध्ये आले आणि ऐकमेकांना डोळे भरुन पाहू लागले. त्यानंतर अर्धा तासातच दोघांचा मृत्यू झाला.'

पण, ही सर्व माहिती खोटी आहे. हे छायाचित्र नेमके कुठले आहे? आणि त्यांची खरी कथा काय आहे हे जाणून घेऊयात.

Video:नवऱ्याच्या वर्क फ्रॉम होमला वैतागली बायको...

संबंधित छायाचित्र हे इटलीमधील नसून स्पेनमधील बार्सिलोनो विमानतळाजवळील आहे. हे छायाचित्र असोसिएटेड प्रेसचे छायाचित्रकार एमिलो मेरेनट्टी यांनी काढले आहे. १२ मार्च २०२० रोजी स्पेनमधील बार्सिलोना विमानतळावर कपल किस करताना त्यांनी छायाचित्र काढले होते. यूरोपमधून अमेरिकेत येणाऱ्या प्रवाशांवर राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्बंध घालत्याची घोषणा केली. त्यानंतरचा काढलेला हा फोटो असल्याचे एमिलो यांनी म्हटले. पण या जोडप्याविषयी त्यांनी अधिक माहिती दिलेली नाही. त्यामुळे हे छायाचित्र कोरोनावर उपचार करत असलेल्या कोणत्याही डॉक्टर दाम्पत्याचे नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

'लॉकडाऊनमध्ये बायकोला आनंदी कसे ठेवाल?'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus viral photo of-couple from itlay here is fact