लढा कोरोनाचा : ऑस्ट्रेलियात जमावबंदी; जाणून घ्या जगात काय घडतंय?

coronavirus worldometer australia cancelled crowded programs
coronavirus worldometer australia cancelled crowded programs

न्यूयॉर्क Coronavirus : जगभरातील कोरोना विषाणूंच्या प्रसाराचा वेग दिवसेंदिवस वाढत असल्याने बहुतांश देशांनी आता टाळेबंदीला सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी अनावश्‍यक गर्दीवर थेट बंदी घालण्याचे आदेश दिले असून लोकांनी परदेश प्रवास टाळायला हवा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज केन रिचर्डसन यालाही विषाणूचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे, केनला मागील काही दिवसांपासून ताप येत होता, आज त्याची तपासणी केली असता त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले. कोरोना संसर्गाचा मोठा फटका चित्रपट उद्योगालाही बसला असून मार्व्हल स्टुडिओजने शांग- ची आणि दि लिजंड ऑफ दि टेन रिंग्ज या दोन्ही चित्रपटांचे चित्रीकरण स्थगित केले आहे. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शक डेस्टिन डॅनियल क्रेट्टन यांच्यातही कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने डॉक्टरांनी त्यांना जमावापासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहेत. ऑस्ट्रेलिया महिला संघाचा दक्षिण आफ्रिकेचा दौराही रद्द करण्यात आला असून, या सामन्याला २२ मार्चपासून सुरुवात होणार होती, क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडूनच तशी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ‘पॅरामाउंट पिक्चर्स’ या प्रोडक्शन होमच्या ‘ए क्वाएट प्लेस पार्ट - २’ या चित्रपटाच्या रिलीजची तारीखही पुढे ढकलण्यात आली आहे. 

जगभरात कोठे काय घडले?

  • नेपाळकडून माउंट एव्हरेस्ट मोहिमांना ब्रेक 
  • रोममधील कॅथोलिक पंथीयांच्या चर्चला टाळे 
  • अमेरिकेतील भारतीय दूतावासाकडून हेल्पलाईन 
  • पुढील आठवड्यातील ब्रेक्झिट चर्चेला पूर्णविराम 
  • एव्हरटन, आर्सेनल चेल्स क्लबच्या 
  • खेळाडूंना वेगळे ठेवण्याचा निर्णय 
  • बल्गेरियामध्ये आणीबाणी जाहीर 
  • कोरियामध्ये एकास विषाणूचा संसर्ग 
  • थायलंडमध्ये आणखी पाच जणांना विषाणूची बाधा 
  • वॉल्ट डिस्नेच्या थीम पार्कलाही संसर्गामुळे टाळे 
  • कॅलिफोर्नियातील डिस्नलँडही पर्यटकांसाठी बंद 

चीनमध्ये आज सातजणांचा मृत्यू 
चीनमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांपैकी सातजणांचा आज मृत्यू झाल्याने येथील मृतांची संख्या आता ३ हजार १७६ वर पोचली आहे. नव्याने आठजणांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. भारतातील या विषाणूचा प्रसार लक्षात घेता पाकिस्तानने सिंध प्रांतातील सर्व शैक्षणिक संस्था ३१ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याच भागातील दहावीच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com