या देशाने आण्विक शस्त्रसाठा भक्कम करण्याचा केला निर्धार; वाचा सविस्तर

वृत्तसंस्था
सोमवार, 25 मे 2020

उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी आण्विक शस्त्रसाठा भक्कम करण्याचा निर्धार केला असून देशासाठी डावपेचात्मक महत्त्व असलेल्या सशस्त्र दलांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. त्या दृष्टिने लष्कराची महत्त्वाची बैठक बोलाविण्यात आली व त्यात नव्या धोरणांविषयी सखोल चर्चा करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

सोल - उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी आण्विक शस्त्रसाठा भक्कम करण्याचा निर्धार केला असून देशासाठी डावपेचात्मक महत्त्व असलेल्या सशस्त्र दलांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. त्या दृष्टिने लष्कराची महत्त्वाची बैठक बोलाविण्यात आली व त्यात नव्या धोरणांविषयी सखोल चर्चा करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोरोना महामारी उद्भवल्यापासून गेल्या दोन महिन्यात किम जोंग उन यांचा सार्वजनिक वावर कमी झाला आहे. त्यातच  गेल्या महिन्यात त्यांच्या प्रकृतीवरून तर्कवितर्क लढविण्यात येत होते. त्यानंतर त्यांनी खताच्या कारखान्यातील एका कार्यक्रमात भाग घेतल्याची छायाचित्रे जगासमोर आली होती, त्यानंतर ते पुन्हा गायब झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले होते. अखेर येथील  सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार२० दिवसांच्या खंडानंतर पहिल्या ज्ञात सार्वजनिक कार्यक्रमात ते अवतीर्ण झाले. सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या मध्यवर्ती लष्करी आयोगाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले. ही बैठक कधी झाली याचा तपशील मात्र देण्यात आला नाही.

कोरोनाची जगातली परिस्थिती : जाणून घ्या एका क्लिकवर

अण्वस्त्र उपक्रम संपविण्याबाबत अमेरिकेबरोबरील चर्चा ठप्प असताना ही बैठक झाली. शत्रू पक्षाचे सततचे मोठे-छोटे धोके आश्वासकपणे रोखणे, त्यासाठी लष्करी अस्त्रांची भेदक क्षमता लक्षणीय प्रमाणावर वाढविणे याविषयी चर्चा झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The country is determined to strengthen its nuclear arsenal