बाथरुमच्या भिंतीत सापडले चक्क 60 वर्षापूर्वीचे मॅक्डोनल्डचे फ्रेन्च फाईज

अमेरीकेतील इलिनॉयच्या एका जोडप्याला घराचे नुतनीकरण करताना त्यांच्या बाथरुमच्या भिंतीत 60 वर्षापूर्वीचे मॅक्डोनल्डचे फ्रेन्च फाईज सापडले.
1950s McDonald's bag
1950s McDonald's bagसकाळ डिजिटल टीम

घराचे नूतनीकरण करताना आपल्याला जुन्या गोष्टी सापडत असतात,यात काय नवीन नाही पण पन्नास-साठ वर्षापुर्वीचे जुने खाण्याचे पदार्थ सापडणे, यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. पण असे झाले आहेत. अमेरीकेतील इलिनॉयच्या एका जोडप्याला घराचे नुतनीकरण करताना त्यांच्या बाथरुमच्या भिंतीत 60 वर्षापूर्वीचे मॅक्डोनल्डचे फ्रेन्च फाईज सापडले. या जोडप्यांनी रेडीटवर पोस्ट शेअर करत या संदर्भा माहिती दिली. (Couple in US found 1950s McDonald's bag with french fries inside wall during home renovations)

1950s McDonald's bag
युक्रेनचा ‘घोस्ट ऑफ किव्ह’ठार

रॉब आणि ग्रेसी हे जोडपे इलिनॉयच्या क्रिस्टल लेकमध्ये राहतात. ते दोघेही घराचे नूतनीकरणाचे काम करत होते. यादरम्यान बाथरूमच्या भिंतीवरून सिमेंटचा तुकडा तुटलेला रॉबला दिसला तेव्हा त्याला त्याच्या आत कागदाचे पॅकेट सापडले. त्याने हे पॅकेट बाहेर काढले आणि पत्नी ग्रेसीला दाखवले.पॅकेटवर मॅक्डोनाल्ड लिहीले होते आणि त्यात फ्रेंच फ्राईजही होते. त्यांनी अलीकडेच Reddit याबाबत माहिती शेअर केली जी खुप आश्चर्यकारक आहे.

रॉबने सांगितले की, त्याला पूर्णपणे खात्री आहे की हे 1959 सालचे मॅक्डोनाल्डचे पॅकेट आहे. तर पत्नी ग्रेसी म्हणते की हे खुप आश्चर्यचकीत करणारे आहे. ६० वर्षे फ्रेंच फ्राईज या मॅक्डोनाल्ड पॅकेटमध्ये कसे असू शकते आणि ते पण खराब न होता इतके चांगले कसे असू शकतात?

1950s McDonald's bag
‘ती’ वारांगणा घ्यायची ग्राहकांचा जीव; संबंधापूर्वी द्यायची...

सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. नेटकरी त्यांना कुतूहलाने अनेक प्रश्न विचारत आहे. या घटनेने मॅक्डोनाल्ड चर्चेत आले असून याचा फायदा येत्या दिवसांमध्ये मॅक्डोनाल्ड ब्रँडला होणार, हे तितकेच खरे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com