हॉलीवूडपुढं वेगळाच प्रश्न : किसिंग सीन कसा शूट करायचा? घेतायत सल्ला

Hollywood
Hollywood

वॉशिंग्टन - चित्रपट निर्मितीच्या तंत्रज्ञानाचा उच्चतम दर्जा राखत अत्युच्च मापदंड निर्माण करणाऱ्या हॉलीवूडला सध्या वेगळ्याच तज्ञांची प्रतिक्षा आहे. त्यांना हवे आहेत कोरोना सल्लागार! चुंबन-अलिंगन येथपासून हाणामारी-हिंसाचार अशी अनेक प्रकारची दृश्ये चित्रीत करण्यापूर्वी काय खबरदारी घ्यायची यासाठी साथरोगतज्ञ, आरोग्य व्यावसायिकांशी सल्लामसलत सुरु आहे. त्यासाठी हारवर्ड, कॅलिफोर्निया अशा विद्यापीठाच्या तज्ञांना करारबद्ध करण्यात आले आहे. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

केशरचनाकार, छायाचित्रकार यांच्यासह अक्षरशः शेकडो प्रकारचे तज्ञ चित्रपटसाठी झटत असतात. कोरोना महामारीनंतर त्यांच्यासाठी अनपेक्षितपणे असे सल्लागार निर्णायक ठरतील. छायाचित्रण सुरु करण्यापूर्वी सेटवर सुरक्षिततेसाठी कोणती उपाययोजना करावी यासाठी निर्माते, स्टुडिओ चालक व कामगार संघटना यांचे या तज्ञांशी विचारमंथन सुरु आहे. कॅलिफोर्निया प्रांताचे गव्हर्नर गावीन न्यूसॉम हे याच आठवड्यात मार्गदर्शक सूचना जारी करण्याची अपेक्षा असून त्याची सर्वांना प्रतिक्षा आहे. 

आव्हाने काय 
- अनेकदा बंदीस्त, अरुंद जागेत असंख्य तंत्रज्ञांचे एकत्र काम 
- नेपथ्यकार आणि कलाकार यांचे सतत एकमेकांच्या जवळ येणे 
- अलिंगन असो किंवा हाणामारी कलाकारांमधील शारिरीक संपर्क अटळ 

मोठा आर्थिक फटका 
- मार्चच्या मध्यापासून जागतिक लॉकडाउन हॉलीवूडलाही लागू 
- चित्रपट उद्योगाला गंभीर आर्थिक फटका 
- लॉस एंजलिससह काही शहरांच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्व 
- नेटफ्लिक्सस, वॉल्ट डिस्ने यांसह अनेक कंपन्यांना नव्या कार्यक्रमांची प्रतिक्षा 

बदल काय होणार? 
- क्रूमधील सदस्यांची संख्या कमी होण्याची अपेक्षा 
- नियमित चाचण्या 
- जवळपास प्रत्येक ठिकाणी सॅनीटायझर 
- पडद्यावर गर्दी किंवा मोठा जमाव दाखविण्यासाठी संगणकाच्या मदतीने प्रतिमांचा कल्पक वापर 

एका गावातील लोकांइतके सदस्य 
- पटकथाकार-दिग्दर्शक टायलर पेरी यांचा मार्गदर्शक नियमावली तयार करण्यात पुढाकार 
- 31 पानी पुस्तिका तयार होणार 
- चित्रपट कर्मचारी, डॉक्टणर, साथरोगतज्ञ, वकील, संघटनांचे प्रतिनिधी, टॅलेंट हंट प्रतिनिधी, क्रु सदस्य, विमा व्यावसायिक यांसह अनेकांचा सहभाग, ज्यांची एकूण संख्या एखाद्या छोट्या गावाच्या लोकसंख्येइतकी 

सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांची चित्रीकरणच्या प्रारंभी आणि दोन आठवड्यांत किमान एकदा चाचणी करावी असा सल्ला मी दिला. स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी इतर प्रकारच्या उपाययोजांचीही माहिती सांगितली, पण संसर्ग टाळण्याची कोणत्याही परिस्थितीत शंभर टक्के खात्री देता येत नाही. कोरोनाचा विषाणू सेटपासून लांब ठेवण्यात अपयश येऊ शकेल, पण जोपर्यंत विषाणू निर्मुलन होत नाही किंवा लस येत नाही तोपर्यंत आपण वाट पाहू शकणार नाही. तसे केले तर पुढील दोन वर्षे आपल्याला कामच करता येणार नाही. 
- डॉ. कार्लोस डेल रिओ, इमॉरी विद्यापीठाचे संसर्गजन्य रोग तज्ञ 

आमच्या सेटवर कोणत्या कल्पना राबविल्या जाणार आहेत याची थोडी माहिती मिळाली, तेव्हा मी चकित झाले. यापूर्वी सेटवर कदापि आलीच नाही अशा कुणा व्यक्तीची ती कल्पना असावी असे मला क्षणभर वाटले. माझ्यामते विमानतळावरील लोक असो किंवा आम्ही सेटवरील कलावंत, सर्वांची स्थिती सारखीच आहे. एकमेकांना सुरक्षित ठेवणे हा आपला उद्देश आहे. हे होऊ शकते, पण अद्याप मला अत्यंत परिणामकारक असे उपाय समजलेले नाहीत. 
- ऍना केंड्रीक, अभिनेत्री 

चित्रपट क्षेत्रात अनेक मुक्त व्यावसायिक (फ्रीलान्सर्स) असतात. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात राहतात. त्यामुळे ते तुमच्या दृष्टिपथात राहात नाहीत. अशावेळी मार्गदर्शक सूचनांचे पालन गुंतागुंतीचे बनते. सर्व टीव्ही कंपन्यांसाठी समान सुचना असणे महत्त्वाचे ठरते. 
- डॉ. पॉल लिचफिल्ड, ब्रिटीश डॉक्टतर 
(ब्रिटनमधील टीव्ही कंपन्यांसाठी मार्गदर्शक सुचना तयार करण्यात सहभाग)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com