esakal | लस येईपर्यंत कोरोनाचं संकट होणार गंभीर; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

covid death who

मेडिकल सायन्स क्षेत्रातील शास्त्रज्ञ रात्रीचा दिवस करून कोरोनावरील लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही लस येऊ पर्यंत जगात परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केलीय.

लस येईपर्यंत कोरोनाचं संकट होणार गंभीर; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

World Health Organisation: जगभरात कोरोनाचं संकट आणखी गहिरं होताना दिसत आहे. काही देश या व्हायरसचा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सामना करत आहेत. पण, अमेरिका, ब्राझील आणि भारतात परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. त्यामुळं सगळ्यांचे डोळे कोरोनावरील लसीकडं लागले आहेत. मेडिकल सायन्स क्षेत्रातील शास्त्रज्ञ रात्रीचा दिवस करून कोरोनावरील लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही लस येऊ पर्यंत जगात परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केलीय.

काय आहे कोरोनाची परिस्थिती?
जगात आतापर्यंत 3 कोटी 27 लाख 65 हजार जणांना कोरोनाची लागण झालीय. तर, 9 लाख 93 हजार जणांचा या व्हायरसने बळी घेतला आहे. सध्याच्या घडीला जगात 75 लाख 93 हजार 395 ऍक्टिव्ह पेशंट आहेत. त्यातील 75 लाख 29 हजार 519 रुग्णांना सौम्य लक्षणे असून, 63 हजार 876 जण गंभीर आहेत. वर्ल्डोमीटरने दिलेल्या या आकडेवारी वरून कोरोनाच्या जगभरातील परिस्थिचं गांभीर्य लक्षात येतं. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं लस येऊपर्यंत जगात काय परिस्थिती उद्भवू शकते? याविषयी भाष्य केलंय.

हे वाचा - खुशखबर! जॉनसन लस देतीय 'कोरोना'विरोधात सकारात्मक परिणाम

जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते?
जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कोरोनावरील लस उपलब्ध होऊपर्यंत हा व्हायरस 20 लाख लोकांचा बळी घेऊ शकतो. हा गंभीर आकडा टाळण्यासाठी योग्य त्या उपाय योजना करण्याची गरज असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन विभागाचे संचालक मायकेल रेयान यांनी म्हटले आहे की, 10 लाख बळी हाच आकडा गंभीर आहे. आपण, आणखी दहा लाख जणांचा बळी जाण्याआधी योग्य पावले उचलली पाहिजेत. आम्ही हा आकडा टाळण्यासाठी एकत्रित प्रयत्न सुरू केले आहेत. आपण, या उपाययोजना केल्या नाहीत तर, दुदैवानं बळींचा आकडा निश्चित मोठा असेल. संभाव्य बळींचा आकडा की काही केवळ कल्पनेतील आकडा नाही तर दुर्दैवानं तेवढे बळी जाऊ शकतात.

हे वाचा - POK वरचा ताबा सोडा; इमरान खान यांना भारताच्या प्रतिनिधीने सुनावलं

भारतात काय स्थिती?
भारतात गेल्या 24 तासांत 85 हजार 362 रुग्णांची वाढ झाली आहे. भारतातील एकूण कोरोना रुणांचा आकडा 59 लाखांच्या वर गेला आहे. देशात 24 तासांत 1 हजार जणांचा बळी गेला असून एकूण बळींची संख्या 93 हजार 379 वर गेली आहे. सध्या भारतात 9 लाख 60 हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून, 48 लाख 49 हजार रुग्ण उपचारांनंतर बरे झाले आहेत.  

loading image
go to top