आठ दिवसांनी दिसतात कोरोनाची लक्षणे; नव्या संशोधनातून समोर आली माहिती

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 8 August 2020

कोरोनाच्या विषाणूने शरीरात प्रवेश मिळविल्यानंतर आठ दिवसांनी रूग्णामध्ये आजाराची लक्षणे स्पष्ट दिसत असल्याचे नव्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. आजपर्यंत हा कालावधी चार ते पाच दिवस गृहीत धरला जात होता.

बीजिंग/ पुणे - कोरोनाच्या विषाणूने शरीरात प्रवेश मिळविल्यानंतर आठ दिवसांनी रूग्णामध्ये आजाराची लक्षणे स्पष्ट दिसत असल्याचे नव्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. आजपर्यंत हा कालावधी चार ते पाच दिवस गृहीत धरला जात होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना रुग्णांच्या मोठ्या लोकसंख्येच्या निरीक्षणातून ही बाब समोर आली आहे. "सायन्स ऍडव्हान्स' या शोधपत्रिकेत नुकतेच हे संशोधन प्रकाशित झाले आहे. कोरोनाचे जन्मगाव असलेल्या चीनमधील वूहान शहरातील रूग्णांतील कोरोना प्रसाराचा अभ्यास यात करण्यात आला आहे. आधिचा अंदाज लावताना शास्त्रज्ञांकडे रूग्णसंख्या कमी होती. तसेच, रुग्णांकडून मिळालेली माहितीमध्ये दोष असण्याची शक्‍यता होती. अशा मर्यादांमुळेच चार ते पाच दिवसांचा अंदाज चुकीचा निघाला असावा, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

अजितदादांकडून बारामतीतील कोरोना रुग्णांना मोठा दिलासा 

आकडे बोलतात.... 
- संशोधनात सहभागी रूग्णसंख्या - 1,084 
- सरासरी लक्षणे दिसण्याचा कालावधी - 7 दिवस 18 तास 
- 14 दिवसांनी लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांची संख्या - 10 टक्के 
- जागतिक स्तरावर निश्‍चित केलेला विलगिकरण कालावधी - 14 दिवस 

ग्रामीण भागात प्रसार वाढला -
भारतातील जास्त लोकसंख्येच्या गावांमध्ये कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचे दिसत आहे. राज्यासह दक्षिण भारतातील काही गावांच्या अध्ययनातून ही बाब पुढे येत आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार केरळ मधील "वलाड' या दुर्गम गावामध्ये मागील दोन आठवड्यात नव्याने 236 लोक कोरोनाबाधित सापडले आहे. तसेच ओडीसाच्या "कटापल्ली' गावात 200 लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे कोरोना नियंत्रणात येण्यापुर्वी 50 दिवस तेथे लॉकडाउन होता. असे असतानाही अचानक रूग्णसंख्या वाढणे प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरली आहे. 

आता एलपीजी सिलिंडर बुकिंग व्हाॅट्सअपवर

प्रसार वाढण्याची कारणे -
- गावात लक्षणे न दिसणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती 
- अरुंद रस्ते, दाटीवाटी असलेली घरे यामुळे सोशल डिस्टंसीग आणि आरोग्य तपासणीत अडचणी 
- लोकसंख्येची घनता जास्त 

ग्रामीण भागातील नागरिकांनी त्याच्या संपर्कात येणाऱ्या लोकांची काळजीपूर्वक नोंद घेणे गरजेचे आहे. तसेच स्वतःमधील आजाराची लक्षणे वेळीच ओळखून योग्य ते पाऊल उचलायला हवे. वैयक्तिक स्वातंत्र्याचा त्याग करत संपूर्ण गावानेच एकत्रित प्रयत्न केल्यास कोरोनावर लवकर विजय मिळवता येईल. 
- डॉ. भ्रामार मुखर्जी, शास्त्रज्ञ, मिशिगन विद्यापीठ, यूएसए. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New research about Corona virus and symptoms