चीन आतातरी मान्य करेल का? वुहान लॅबमधील धक्कादायक VIDEO VIRAL

चीन आतातरी मान्य करेल का? वुहान लॅबमधील धक्कादायक VIDEO VIRAL

न्यूयॉर्क - कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाने भारतात लाखो लोकांचे प्राण घेतले आहेत. तसंच जगाच्या अर्थव्यवस्थेलाही यामुळे मोठा फटका बसला आहे. कोरोनाचा उगम चीनमध्ये झाल्याचं सांगत अनेक देशांनी चीनवर आरोप केले आहेत. जगभर कोरोना पसरण्याला चीनच कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, चीनच्या वुहान लॅबमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये चीन कशाप्रकारे जिवंत वटवाघूळांना डांबून ठेवते हे दिसत आहे.

अनेक देशांसह तज्ज्ञांनी असं मत नोंदवलं आहे की, चीनच्या वुहान लॅबमध्ये कोरोना व्हायरस तयार करण्यात आला. याबाबत बरीच नवीन माहिती सतत समोर येत आहे. वुहान लॅबमधील नव्या व्हिडिओमुळे आता जागतिक आरोग्य संघटनेच्या चौकशीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं की, वुहानच्या लॅबमधून व्हायरस जगभर पसरला असं म्हणणं कठीण आहे. जागतिक आरोग्य संघटनेचं एक पथक वुहानमध्ये कोरोनाचा स्रोत शोधण्यासाठी गेलं होतं. तेव्हा चीनच्या अधिकाऱ्यांनी या पथकावर पाळतही ठेवल्याचा आऱोप केला गेला. तसंच पथकाला आवश्यक ती माहितीसुद्धा पुरवली नव्हती. आता व्हायरल होत असलेला व्हिडिओ 2017 मधील आहे.

चीन आतातरी मान्य करेल का? वुहान लॅबमधील धक्कादायक VIDEO VIRAL
ब्रिटनमध्ये डेल्टा व्हेरिएन्टचा धोका; निर्बंध शिथिल नाहीच

चायना अकॅडमी ऑफ सायन्सने अधिकृत व्हिडिओ जारी करण्याआधी वुहान लॅबमध्ये बायोसेफ्टी लेवल 4 ची सुरक्षा पुरवली होती. व्हिडिओमध्ये वैज्ञानिक वटवाघुळांना किडे खायला घालत असल्याचं दिसतं. तसंच वैज्ञानिक यामध्ये बोलतानाही दिसतात. याआधी जागतिक आरोग्य संघटनेनं सादर केलेल्या अहवालात लॅबमध्ये वटवाघूळ ठेवले जात असल्याचा उल्लेख नव्हता. तिथं फक्त प्राणी ठेवले जात होते असं म्हटलं होतं.

चीन आतातरी मान्य करेल का? वुहान लॅबमधील धक्कादायक VIDEO VIRAL
Novavax ची लस 90 टक्के प्रभावी; नव्या व्हेरियंटवर देखील रामबाण

जागतिक आरोग्य संघटनेचे पीटर दस्जाक यांनी वुहान लॅबमध्ये वटवाघूळ ठेवणे हा एक कट असल्याचं म्हटलं होतं. वुहान लॅबमधील व्हिडिओ DRASTIC नावाच्या एका गटाने शोधल्याचा दावा केला आहे. कोरोनाचा उगम शोधण्यासाठी हा गट स्वतंत्रपणे काम करत आहे. नुकतंच अमेरिकेतील अनेक गुप्त अहवालांमध्येही असा दावा केला आहे की, कोरोनाचा संसर्ग सुरु होण्याच्या आधी लॅबमधील तीन जणांमध्ये कोरोनासदृश्य लक्षणे आढळली होती. तर चीनने जैविक शस्त्र म्हणून कोरोना व्हायरस तयार केल्याचे आरोपही आतापर्यंत करण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com