esakal | कोरोनामुळे जगभरात चीनची 'नाचक्की'; बड्या देशांना जिनपिंग यांच्यावर नाही विश्वास
sakal

बोलून बातमी शोधा

President_Xi_Jinping_20edited

कोरोना महामारीची सुरुवात चीनच्या वुहान शहरातून झाली. पाहता-पाहता हा विषाणू सर्व जगभर पसरला.

कोरोनामुळे जगभरात चीनची 'नाचक्की'; बड्या देशांना जिनपिंग यांच्यावर नाही विश्वास

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- कोरोना महामारीची सुरुवात चीनच्या वुहान शहरातून झाली. पाहता-पाहता हा विषाणू सर्व जगभर पसरला. सर्व देश या विषाणूविरोधात लढत आहेत.  कोरोनामुळे जगाचं खूप मोठं नुकसान होत आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतील Pew Research Center ने एक सर्वे घेतला होता. या सर्वेमध्ये जगातील 14 प्रगतीशील देशातील लोकांमध्ये चीनविरोधात संताप निर्माण झाल्याचे सांगण्यात आले आहे.

10 जून ते 3 ऑगस्टदरम्यान हा सर्वे घेण्यात आला होता. यामध्ये असे आढळून आले की, अधिकतर देशांमधील लोकांनी चीनविरोधात नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. या सर्वेमध्ये 14,276 प्रौढ व्यक्तींना टेलिफोनद्वारे संपर्क साधण्यात आला होता. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, जर्मनी, नेदरलँड, जापान, स्वीडन, यूएसए, साऊथ कोरिया, स्पेन आणि कॅनाडामध्ये चीनविरोधातील चीड उच्च पातळीला पोहोचली आहे. 

मी तयारच आहे मात्र ट्रम्प कोरोनाग्रस्त असताना दुसरी प्रेसिडेंशियल डिबेट नको -...

कोरोना महामारी थैमान घालत असताना आणि अमेरिकीच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका जवळ आल्याच्या पार्श्वभूमीवर हा सर्वे घेण्यात आला आहे.  pew रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, 61 टक्के लोकांना वाटतं की चीनने कोरोना विषाणूला हाताळताना खूप वाईट काम केलं आहे, तर 37 टक्के लोकांना वाटतं की चीनने चांगलं काम केलं आहे. अमेरिकेत चीनविरोधात जास्त राग दिसून आला. अमेरिकेतील 84 टक्के लोकांनी चीनने परिस्थिती वाईट पद्धतीने हाताळला असं म्हटलं आहे.

कोरोना महामारीच्या प्रादुर्भावानंतर जगाचा चीनकडे पाहण्याचा दृष्टीकोन कमालीचा बदलला आहे. अनेकांनी चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग यांच्याबद्दलही प्रतिक्रिया दिली असून ते वाईट काम करत असल्याचं म्हटलं आहे. शिवाय चीनच्या नागरिकांना आपल्या राष्ट्रपतींवर विश्वास नाही, असंही अनेकाचं मत आहे.

ट्रम्प यांना फेसबुक-ट्विटरचा दणका; कोरोनाला हलक्यात घेण्याची केली चूक

काहींनी अमेरिकीचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा शी जिनपिंग यांच्यावर जास्त विश्वास दाखवला आहे. जर्मनीमध्ये 78 टक्के लोकांनी जिनपिंग यांच्यावर विश्वास नसल्याचे म्हटलं आहे, तर 89 टक्के लोकांनी ट्रम्प यांच्यावरही विश्वास नसल्याचे म्हटलं आहे. आर्थिक सामर्थ्याबाबत चीनने चांगली प्रगती केली आहे. अमेरिका, जपान आणि साऊन कोरियातील लोकांना अमेरिकाच आर्थिक शक्ती असल्याचं वाटतं.

दरम्यान, जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 3.5 कोटींच्या पुढे गेली आहे. कोरोना विषाणूने अमेरिकेला सर्वाधिक पिडले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या परिस्थितीसाठी चीनला जबाबदार धरलं असून वारंवार टीका केली आहे. शिवाय ट्रम्प यांनी ''चिनी विषाणू'' असा उल्लेख केला आहे.

(edited by- kartik pujari)