
बीजिंग, ता. ४ (पीटीआय): गेल्या पाच महिन्यांपासून जगभरात कोरोनाने हाहाकार उडवला आहे. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशात लस शोधण्याचं काम सुरू आहे. दरम्यान, कोरोना संसर्गाचा केंद्रबिंदू ठरलेल्या चीनच्या वुहान येथे गेल्या दोन आठवड्यात सुमारे एक कोटी नागरिकांची कोरोना चाचणी केली असून त्यातील एकही नागरिकांना कोरोनाची बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु लक्षणे नसलेले परंतु बाधित असलेल्या ३०० जणांना विलिगीकरण कक्षात ठेवले आहे. त्याचबरोबर त्यांच्या संपर्कात असलेल्या ११७४ जणांना देखील वेगळे ठेवण्यात आले आहे.
कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्यापेक्षा वेगळी असल्याचं म्हटलं जात आहे. वुहानमध्ये लक्षणे नसलेल्या कोरोना संसर्गाची दुसरी लाट असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यात ३०० नागरिकांना ताप, खोकला किंवा घशात घवघव होणे असा कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता. तरीही चाचणीत त्यांना संसर्गाची बाधा झाल्याचे चाचणीत आढळून आले होते. त्यांच्यापासून अन्य नागरिकांना देखील बाधा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुमारे १४०० जणांना वेगळे ठेवले आहे.
तत्पूर्वी चीनमध्ये कोविड-१९ चे नवीन पंधरा रुग्ण आढळून आल्याचे सांगण्यात आले होते. राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या मते, दोन दिवसांपूर्वी पाच जण बाधित असल्याचे आढळून आले आणि ते बाहेरून आलेले होते. त्याचवेळी दहा जणांना कोणतेही लक्षणे नव्हती, परंतु त्यांच्यात कोरोना आढळून आला. आतापर्यंत लक्षणे नसलेल्या बाधितांची संख्या ३७१ असून त्यापैकी ३९ जण परदेशातून आलेल आहेत. त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे.
लक्षणे नसलेल्या रुग्णांमुळे कोरोनाचा प्रसार अधिक होण्याची शक्यता असल्याचे डॉक्टर सांगत आहे. शहरातील चाचणी मोहिम राबवण्यात येत असून या मोहिमेमुळे केवळ वुहानमधील नागरिकांना नाही तर चीनचा आत्मविश्वास वाढवण्यास हातभार लागेल, असे चीनचे आजार नियंत्रक आणि प्रतिबंधक विभागाचे उपसंचालक फेंग झिजीआन यांनी सांगितले. लक्षणे नसलेल्या रुग्णांचया जोखमीच्या पातळीबाबत आताच सांगणे कठिण आहे. कारण त्याबाबतचे कोणतेच ठोस पुरावे अद्याप आरोग्य विभागाकडे नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
चीनमध्ये कोरोनामुळे एकुण मृत्युमुखी पडणाऱ्या संख्येपैकी ८० टक्के नागरिक वुहानचे आहेत. त्यामुळे तेथे अतिदक्षता बाळगली जात आहे. वुहान शहरात १४ मे ते १ जून दरम्यान मोफत चाचणी मोहिम घेण्यात आली आणि त्यातंर्गत १ कोटी नागरिकांची तपासणी करण्यात आली. जर मागील चाचण्यांचा समावेश केला तर त्याची संख्या १ कोटी १० लाखांपर्यंत जावू शकते. यात पाच वर्षावरील प्रत्येकांची चाचणी केल्याचा दावा वुहानच्या आरोग्य विभागाने केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.