Crime News : आधी चिमुरड्यांच्या अंगावर जबरदस्ती टॅटू काढले अन् नंतर...आई-वडिलांचं भयंकर कृत्य उघड

ही दोन्ही मुलं ९ आणि ५ वर्षांची आहेत. तर आरोपी पुरुष या मुलांचा वडील असून स्त्री सावत्र आई आहे.
Tattoo File photo
Tattoo File photogoogle

अमेरिकेतल्या एका जोडप्याने आपल्या मुलांच्या अंगावर बळजबरीने टॅटू गोंदवून घेतले आणि त्यानंतर हे टॅटू काढून टाकण्याचा प्रयत्न केला. यामुळेच या जोडप्याला अटक करण्यात आली आहे.

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, मेगन मे आणि त्याची दुसरी पत्नी गनर फार या जोडप्याने आपल्या ९ आणि ५ वर्षांच्या मुलांना बांधून जबरदस्तीने टॅटू काढून घेतला. एका मुलाच्या पायावर टॅटू काढण्यात आला असून एकाच्या खांद्यावर टॅटू काढण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासात दिसून आलं आहे की मुलांना दोरीने बांधलं होतं, तर त्यांचं तोंड टेपने चिकटवलं होतं आणि डोळेही चिंधीने झाकले होते.

Tattoo File photo
Chhatrapati Sambhajinagar Crime : 'वडापाव, गुंगीचे औषध देत घरी नेलं अन् विवस्त्र करत...'; समाजसेवक म्हणवणाऱ्या आरोपीला अटक

हे टॅटू पाहून सरकारी अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला आणि त्यानंतर बाल संरक्षण सेवेकडे तक्रारही केली. या जोडप्याला ही माहिती मिळताच त्यांनी बळजबरीने टॅटू काढून टाकण्याचा प्रयत्न केला. त्वचेचा काही भाग कापून खरवडून काढण्याचा प्रयत्न केला. पुढे टॅटू लिंबाच्या रसाने चोळला. या भीषण प्रकारानंतर या जोडप्याला अटक करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com