
स्वतःच्या पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न करताना चुकून स्वतःच्याच हाताला चाकू लागून दोन बोटं तुटलेल्या पतीला कोर्टानं १७,५०० पौंडांची रक्कम नुकसान भरपाई जाहीर केल्याचा प्रकार युकेमध्ये (United Kingdom) घडला आहे. डोरिनल कोजानू असं या ३६ वर्षीय पतीचं नाव असून त्याला पत्नी डॅनिला हिच्या खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सन २०१५ मध्ये ११ वर्षांचा कारावासाची शिक्षा झाली होती. (cut off his own hand an attempt to kill his wife Court orders compensation to husband)
कोजानू यानं दारुच्या नशेत धारदार चाकूच्या सहाय्यानं आपली ३५ वर्षीय पत्नी डॅनिला हिला भोसकलं होतं. या हल्ल्यामध्ये डॅनिला ही गंभीररित्या जखमी झाली. यानंतर तिच्यावर जवळपास चार महिने रुग्णालयात उपचार सुरु होते. पण जेव्हा कोजानूनं पत्नीवर चाकूनं वार करताना त्याच्या स्वतःच्या उजव्या हाताची दोन बोटे कापली गेली. ज्यासाठी त्याला तातडीनं शस्त्रक्रिया करावी लागणार होती. पण तुरुंगात डॉक्टरांनी त्याला योग्य उपचार न केल्यानं त्याला आपल्या उजव्या हातानं काम करण्यावर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळं कोजानूनं आपल्याला नुकसान भरपाई मिळावी यासाठी NHS (युकेची राष्ट्रीय आरोग्य सेवा) विरोधात दावा दाखल केला होता.
मे २०२१ मध्ये यांसदर्भतील खटल्यावर नॉर्विच कन्ट्री कोर्टात सुनावणी सुरु होती. यावेळी न्या. रेकॉर्डर गिब्सन यांनी कोजानूला ८,५०० पौंडांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. यामध्ये न्या. गिब्सन यांनी त्याचा वैद्यकीय निष्काळजीपणाचा दावा फेटाळून लावला होता. पण एवढ्यावर सामाधान न झाल्यानं कोजानूच्या वकिलानं हायकोर्टात धाव घेतली. यावेळी न्या. जस्टीस रिची यांनी त्याच्या भरपाईत वाढ करुन १७,५०० पौंड देण्याचे आदेश दिले.
हायकोर्टाच्या या आदेशानंतर मात्र, कोजानूची पत्नी डॅनिला हीनं संताप व्यक्त केला. "कोर्टाचा हा निर्णय म्हणजे माझा अपमान असून खूपच घाणेरडी बाब असल्याचं म्हटलं आहे. हा व्यक्ती हिंसक असून घरगुती हिंसाचार करणारा आहे. तसेच त्यानं मला ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण तरीही त्याला नुकसान भरपाई देण्यात आली, उलट मला तर एक पैसाही मिळाला नाही. मी तर चार महिन्यांसाठी रुग्णालयात होते तरीही मला कुठलीही मदत मिळाली नाही" असं डॅनिला हिनं म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.