
दंगली रोखण्यासाठी श्रीलंकेत दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश
कोलंबो : श्रीलंकेत पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे (Mahindra Rajpakshe) यांच्या राजीनाम्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसा (Riot) उसळली आहे. अनेक ठिकाणी आंदोलकांनी मंत्र्यांची घरे आग लावत पेटवून दिली आहेत. या सर्व वाढत्या हिंसाचारांच्या घटना थांबण्यासाठी श्रीलंकन संरक्षण मंत्रालयातर्फे (Defense Ministry) दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. (Shoot on Sight Orders In Sri Lanka )
राजपक्षेंनी घेतला नौदलाच्या तळावर आश्रय
दरम्यान, देशातील वाढती हिंसा लक्षात घेता,पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर महिंदा राजपक्षे (Sri Lanka Ex PM Mahinda Rajpaksa) आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांनी नौदल तळावर आश्रय घेतला आहे. मात्र, ही माहिती मिळताच आंदोलकांनी नौदल तळावर देखील निदर्शने सुरू केली आहेत. कोलंबोमधील अधिकृत निवासस्थान सोडल्यानंतर, माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नौदल तळावर ठेवण्यात आले आहे. त्रिकोमाली नौदल तळावर त्यांचा मुक्काम असून याच ठिकाणी आंदोलन सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे.
हेही वाचा: शरद पवारांनी आता उद्धव ठाकरेंना सल्ले द्यावे; फडणवीसांचा सल्ला
गेल्या अनेक दिवसांपासून श्रीलंकेत आर्थिक संकट आहे. नागरिक अनेक दिवसांपासून महागाईचा सामना करत आहेत. आता जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी उग्र रुप धारण करत सरकारमधील मंत्र्यांवर हल्ले करणं सुरू केले आहे. राजपक्षे यांनी सोमवारी राजीनामा दिल्यानंतर आंदोलनाचे हिंसाचारात रुपांतर झाले. सोमवारी देशभरात हिंसाचार पाहायला मिळाला. राजपक्षे यांच्या सरकारमधील एका खासदाराची गाडी देखील आंदोलकांनी अडवली. त्यावेळी आंदोलकांवर करण्यात आलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला, तर एक जखमी झाला. त्यानंतर खासदारांनी स्वतःला गोळी मारून घेत आत्महत्या केली. या हिंसाचारात पाच जणांना मृत्यू झाला आहे.
हेही वाचा: आरोग्य भरती परीक्षांबाबत टोपेंचे महत्त्वाचे विधान; म्हणाले...
राजपक्षेंचे वडिलोपार्जित घर देखील आगीच्या भक्ष्यस्थानी
देशातील हिंसाचाराने भीषण वळण घेतले असताना, राजपक्षे कुटुंबाचे हंबनटोटा येथील वडिलोपार्जित घर निदर्शकांनी पेटवून दिले. याठिकाणी राजपक्षे कुटुंबीयांपैकी अनेकजण अजूनही लपून बसले आहेत. तिथेदेखील जमावाने हल्ला केला. यावेळी पोलिसांनी गोळीबार करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला.
Web Title: Defence Ministry Of Sri Lanka Issues Shoot On Sight Orders To Quell Riots
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..