उबरकडून आता मद्याची डिलिव्हरी

उबरकडून आता मद्याची डिलिव्हरी

सॅन फ्रान्सिस्को - कोरोनाच्या जागतिक साथीचा फटका बसल्यामुळे विविध कंपन्यांनी वेगळ्या क्षेत्रात प्रवेश करून व्यवसायाच्या संधी हेरण्यास प्रारंभ केला आहे. उबरनेही विस्तारीकरणाचा अवलंब केला असून मद्याची डिलिव्हरी देण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी अमेरिकेतील ड्रीझली या कंपनीशी करार करण्यात आला आहे.

उबर इट््स आणि ड्रीझली यांच्यात १.१ अब्ज डॉलरचा करार करण्यात आला आहे. त्यानुसार ड्रीझली बाजारपेठेतील त्यांचा वाटा कायम ठेवेल. त्याचवेळी उबर इट््स अॅपवरही त्यांचा समावेश असेल. मद्याची डिलिव्हरी या अॅपवरील कायमस्वरूपी सुविधा असेल.

कायदा पाळण्याचा दावा
ड्रीझली ही अमेरिकेतील मागणीनुसार अल्कोहोलयुक्त पेयांचा पुरवठा करणारी अग्रगण्य कंपनी आहे. तेथील बहुतांश प्रांतांमधील चौदाशेहून जास्त शहरांमध्ये ड्रीझलीची सेवा उपलब्ध आहे. त्याठिकाणी असलेल्या कायदेविषयक नियमांचे पूर्णपणे पालन होईल अशा पद्धतीने व्यवसायाची रचना असल्याचे उबरकडून सांगण्यात आले.

अल्पवयीन ग्राहकांना पुरवठा
वॉशिंग्टन पोस्टने गेल्या वर्षी दिलेल्या वृत्तानुसार ग्राहकांच्या ओळखपत्रांची पडताळणी न करता उबर त्यांना मद्याची डिलिव्हरी करीत होती. उबेरची सेवा नसलेल्या ठिकाणी रेस्टॉरंट चालकांनी गैरफायदा घेतला आणि मद्याचे पार्सल आणि डिलिव्हरी देण्यास प्रारंभ केला. याबाबत कॅलिफोर्निया अल्कोहोलयुक्त पेय नियंत्रण खात्याच्या नियमन अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यात अल्पवयीन ग्राहकांना अल्कोहोलयुक्त मद्याचा नियमित पुरवठा केला जात असल्याचे आढळून आले. त्यानंतर उबरने ओळखपत्र असलेल्या ग्राहकांना घरापाशी सेवा देण्यास प्रारंभ केला आहे.

शेतकऱ्यांसाठी कायपण! अमेरिकेतील NBA स्टार खेळाडूने केली आर्थिक मदत

या करारामुळे ड्रीझलीला उबरचाही ग्राहकवर्ग उपलब्ध होईल आणि त्यांची  वाटचाल वेगवान होईल. आगामी काळात जागतिक नकाशावरील त्यांच्या अस्तित्वाचाही विस्तार होईल.
- दारा खोस्रोवशाही, उबरचे सीईओ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com