शेतकऱ्यांसाठी कायपण! अमेरिकेतील NBA स्टार खेळाडूने केली आर्थिक मदत

टीम ई सकाळ
Friday, 5 February 2021

भारतातील सेलिब्रिटींनी परदेशातील व्यक्तींनी आमच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये नाक खुपसू नये असं म्हणत आंतरराष्ट्रीय पातळीवर देशात फूट पाडण्याचं कारस्थान असल्याचं म्हटलं आहे.

न्यूयॉर्क - भारतात सुरु असलेल्या कृषी कायद्याविरोधातील आंदोलनाला आता जगभरातून पाठिंबा मिळत आहेत. अमेरिकन पॉप सिंगर रिहानाने ट्विट केल्यानंतर जगभरातील सेलिब्रिटींनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यामुळे भारतातील सेलिब्रिटींनी परदेशातील व्यक्तींनी आमच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये नाक खुपसू नये असं म्हणत आंतरराष्ट्रीय पातळीवर देशात फूट पाडण्याचं कारस्थान असल्याचं म्हटलं आहे. यावरून सोशल मीडियावर नवा वादही निर्माण झाला आहे. 

दरम्यान, अमेरिकन फुटबॉल लीग एनएफएलचा स्टार खेळाडू जुजु स्मिथने भारतातील कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. फक्त सोशल मीडियावर पाठिंबाच दिला असं नाही तर त्यासोबत 10 हजार अमेरिकन डॉलर्सची म्हणजेच जवळपास 7 लाख रुपयांची मदत आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांना वैदकीय सुविधांसाठी दिली आहे. एनबीए फॉरवर्ड काइल कुज्मा यानेही आंदोलनाचं समर्थन केलं  आहे.

जुजुने ट्विट करून म्हटलं की, मला हे सांगण्यास आनंद होत आहे की, भारतात शेतकऱ्यांच्या वैद्यकिय मदतीसाठी 10 हजार डॉलर दिले आहेत. आसा आहे की यापुढे त्यांचा जीव वाचेल. #FarmersProtest

हे वाचा - घाबरत नाही! दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केल्यानंतर ग्रेटाचं पुन्हा ट्विट

हे वाचा - कंगना आतातरी भानावर ये! ट्विटरलाही टिवटिव पटेना

एनबीएचा माजी स्टार बारोन डेव्हिसनेसुद्धा रिहानासारखचं ट्विट केलं आहे. त्यानं म्हटलं की, भारतात काय सुरु आहे यावर आपण बोलणार आहोत का? शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत जागृतीसाठी माझ्यासोबत या. #FarmersProtest


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: american football player juju smith schuster donate 10 thousand dollars farmers protest