esakal | हिऱ्यांच्या व्यवसायाचीही झळाळी नष्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Diamond

दोन दशकांत तिसरी मंदी
पूर्वी डी बीयर्स कंपनीकडे हिऱ्यांच्या उद्योगाची मक्तेदारी होती. ती संपुष्टात आल्यानंतर पुरवठ्याचे व्यवस्थापन करण्याची डोकेदुखी उद्योगासमोर निर्माण झाली. दोन हजार दशकाच्या प्रारंभी कंपनीला पाच अब्ज डॉलरच्या साठ्याचा मुद्दा हाताळावा लागला. त्यातच तेव्हा तसेच २०१३ मध्ये जागतिक मंदीमुळे उद्योगाच्या पुरक वस्तुंच्या साठ्याचीसमस्या निर्माण झाली. दरवेळी विक्रीसाठी हिऱ्यांना पॉलिश करण्यापासून पैलू पाडणारे, व्यापारी आणि खरेदीदार यांच्यावर ताण पडला. किरकोळ विक्रीला फटकाहिऱ्यांच्या व्यवसायातील दलालांना महामारीपूर्वीचझगडावे लागत होते. आता लागू झालेल्या विविध निर्बंधांमुळे किरकोळ विक्रीला आणखी मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे.

हिऱ्यांच्या व्यवसायाचीही झळाळी नष्ट

sakal_logo
By
यूएनआय

कोरोना महामारीमुळे हिऱ्यांच्या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. वाढता साठा, घटत्या किंमती, कमी मागणी अशी कोंडी झालेल्या कंपन्यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हिऱ्याच्या खाणींचे मालकी हक्क असलेल्या कंपन्यांकडे करोडो डॉलर्स किंमतीच्या रत्नांचा साठा पडून आहे. बंद असलेली दालने, लॉकडाऊनमुळे घरी बसून असलेले पॉलीश कारागीर, विक्रीसाठी घाऊक पातळीवर हिरे खरेदी करणाऱ्या व्यावसायिकांना प्रवास करणे अशक्‍य अशा विविध कारणांमुळे याव्यवसायासमोर मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

प्रमुख कंपनी पेचात

  • आफ्रिकेतील बोट्‌वाना देशाची राजधानी गबोरोने येथील खाणींची मालकी असलेल्याडी बीयर्स कंपनीकडे मोठा साठा पडून
  • फेब्रुवारीपासून विक्री अशी झालीच नसल्याने साठ्यात वाढ
  • किंमत कमी करण्यास नकार, साठा कमी करण्यासाठी उत्पादन घटविले

प्रतिस्पर्ध्यासमोरही प्रश्न

  • अलरोसा या प्रतिस्पर्धी रशियन कंपनीसमोरही समस्या
  • जागतिक व्यापार ठप्प झाल्याने अब्जावधी किंमतीच्या साठ्याचा प्रश्न
  • वसुलीवर परिणाम होऊ न देता साठा कमी करण्याचे आव्हान

भारतात तब्बल ७ हजार कोटींची गुंतवणूक; कसा टाकणार चीनी वस्तूंवर बहिष्कार?

छोट्या खाणमालकांचे आव्हान

  • छोटे खाणमालक मुळातच अस्तित्वासाठी झगडत होते. त्यांनी आता २५ टक्‍क्‍यांपर्यंत सुट देऊ केली आहे. त्यामुळे मोठ्या कंपन्यांना ग्राहक मिळविणे अवघड जाईल.

अनुकूल घडामोडी

  • चीमधील किरकोळ व्यापाऱ्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू
  • सुरतमधील कारखान्यांत ५० टक्के क्षमतेसह काम
  • भारतातील प्रमुख व्यापाऱ्यांची कार्यालये निर्बंधांसह सुरू

पाकिस्तानी चौकीबाहेर गाढव ओरडतेय जोर-जोरात...

दोन दशकांत तिसरी मंदी
पूर्वी डी बीयर्स कंपनीकडे हिऱ्यांच्या उद्योगाची मक्तेदारी होती. ती संपुष्टात आल्यानंतर पुरवठ्याचे व्यवस्थापन करण्याची डोकेदुखी उद्योगासमोर निर्माण झाली. दोन हजार दशकाच्या प्रारंभी कंपनीला पाच अब्ज डॉलरच्या साठ्याचा मुद्दा हाताळावा लागला. त्यातच तेव्हा तसेच २०१३ मध्ये जागतिक मंदीमुळे उद्योगाच्या पुरक वस्तुंच्या साठ्याचीसमस्या निर्माण झाली. दरवेळी विक्रीसाठी हिऱ्यांना पॉलिश करण्यापासून पैलू पाडणारे, व्यापारी आणि खरेदीदार यांच्यावर ताण पडला. किरकोळ विक्रीला फटकाहिऱ्यांच्या व्यवसायातील दलालांना महामारीपूर्वीचझगडावे लागत होते. आता लागू झालेल्या विविध निर्बंधांमुळे किरकोळ विक्रीला आणखी मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे.

हिऱ्याच्या खाणमालकांची घसरलेल्या किंमती आणि विक्रीतील घट अशा दुहेरी समस्यांमुळे कोंडी झाली आहे. २००८-०९ मधील मंदीच्या वेळी निर्माण झाली तशी परिस्थिती उद्भवते आहे.
- सर्जी डॉनस्कॉय, रशियन तज्ञ

कच्च्या हिऱ्यांचा पुरवठा मर्यादीत ठेवून बाजारपेठेचे तसेच किंमतीचे संरक्षण करण्याचा खाणमालक कंपन्यांचा प्रयत्न आहे, मात्र ते साठा कमी कसा करणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
- अनिष अगरवाल, जेमडॅक्‍स कंपनीचे भागीदार