esakal | दलजीतची इव्हान्काला 'ऑफर'; तर मनोज वाजपेयी पडले हॉलिवूडवर भारी!
sakal

बोलून बातमी शोधा

Diljit-Ivanka-Manoj

बॉलिवूडमधील कसलेल्या अभिनेत्यांपैकी एक असलेल्या मनोज वाजपेयींनीही 'हम भी किसीसे कम नही' म्हणत दलजीतला टक्कर देत एक व्हिडिओ अपलोड केला आहे.

दलजीतची इव्हान्काला 'ऑफर'; तर मनोज वाजपेयी पडले हॉलिवूडवर भारी!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इतकीच त्यांची मुलगी इव्हान्का ट्रम्प भारतामध्ये लोकप्रिय आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा इव्हान्काच्या फॅन फॉलोअर्सची संख्या काकणभर जास्त असून दिवसेंदिवस त्यात भर पडत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

गेल्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प आपल्या कुटुंबीय आणि अमेरिका प्रशासनातील काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत भारत दौऱ्यावर आले होते. दोन दिवसीय दौरा संपवून ते मायदेशी परतले असले तरी सोशल मीडियावर डोनाल्ट ट्रम्प आणि इव्हान्का यांची जोरदार चर्चा सुरू आहे. भारतीयांनी बनवलेले मीम्स इव्हान्काला इतके आवडले की, तिने आपल्या ट्विटर अकाउंटवरून ते मीम्स शेअर केले आहेत.

- ...म्हणून मराठी चित्रपटसृष्टीला पडलीय 'या' भागाची भुरळ

पंजाबी गायक आणि बॉलिवूड अभिनेता दलजित दोसांझ सोबतचा असाच एक मीम्सचा फोटो सर्वाधिक चर्चिला गेला आहे. इव्हान्का ताजमहाल दाखव म्हणून मागे लागली होती, म्हणून मी तिला ताजमहाल दाखविण्यासाठी घेऊन आलो, अशा आशयाचं ट्विट दलजीतने केले होते. 

इव्हान्कानेही या एडिट केलेल्या फोटोला पसंती दर्शवली असून दलजीतला त्याच्या भाषेत ट्विटरवरून रिप्लाय दिला. मला ताजमहाल दाखवल्याबद्दल दलजीत तुझे खूप आभार. हा एक अविस्मरणीय अनुभव होता, असे प्रत्युत्तर इव्हान्काने दलजीतला दिले. 

- दिल्ली हिंसाचारावर पुन्हा बोलली सोनम; म्हणाली 'शांत राहणे शहाणपणाचे नाही!'

इव्हान्काचा रिप्लाय आलेला पाहून दलजीतला आकाश ठेंगणे झाले. त्याने लगेच इव्हान्काला पुढची ऑफरही देऊन टाकली. तो म्हणाला, ''अतिथी देवो भव. थँक्यू इव्हान्का, हा फोटोशॉप नाहीय, हे मी सगळ्यांना सांगितलं. आपण लवकरच भेटू.. पुढच्या वेळेस लुधियानाला जाऊ.''

- Sooryavanshi Trailer : 'आ रही है पोलिस' म्हणत सूर्यवंशी, सिंघम, सिंबाचा दंगा

तसेच बॉलिवूडमधील कसलेल्या अभिनेत्यांपैकी एक असलेल्या मनोज वाजपेयींनीही 'हम भी किसीसे कम नही' म्हणत दलजीतला टक्कर देत एक व्हिडिओ अपलोड केला आहे. मनोज वाजपेयींनी अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये इंग्लंडची राणी व्हिक्टोरियापासून हॉलिवूडच्या अनेक सौंदर्यवती आणि रशियाची टेनिसपटू मारिया शारापोव्हाचा समावेश आहे. आणि विशेष म्हणजे दलजीतही प्रत्येक फोटोत दिसत आहे.

''हम हैं मंगल और पडेंगे सब पे भारी,'' असे कॅप्शन वाजपेयींनी दिले आहे. 

loading image
go to top