जगात प्रचंड गतीने पसरत आहे आणखी एक महामारी; इबोलाचा शोध लावणाऱ्या डॉक्टरचा इशारा 

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 3 January 2021

कोरोना महामारी जगभरात थैमान घालत आहे.

नवी दिल्ली- कोरोना महामारी जगभरात थैमान घालत आहे. असे असताना इबोलाचा शोध लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एका डॉक्टरने दिलेल्या इशाऱ्यामुळे चिंता वाढली आहे. प्रोफेसर जीन-जॅक्स मुयेम्बे यांनी कोरोना महामारी सारखीच आणखी एक महामारी मोठ्या गतीने पसरत असल्याचा दावा केला आहे. या महामारीला Disease X नाव देण्यात आले आहे. त्यांनी म्हटलंय की आफ्रिकेच्या घनदाट वर्षा वनांमध्ये कोरोनापेक्षा घातक विषाणू निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

भारत बायोटेकच्या लशीला मंजुरी मिळाल्याने काँग्रेस नेते नाराज; आरोग्यमंत्र्यांना...

अमेरिकेचे टीव्ही चॅनल सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत प्रोफेसर जीन म्हणाले की, आपण अशा जगात जगत आहोत जेथे नवे विषाणू निर्माण होत राहतील आणि हे विषाणू मानव जातीसाठी धोकादायक असतील. भविष्यात येणारी महामारी कोरोना विषाणूपेक्षा अधिक भयंकर असेल आणि त्यामुळे अधिक लोकांचा मृत्यू जाऊ शकतो. कांगोच्या एका महिलेला विचित्र आजार झाला आहे. महिलेची इबोला चाचणी करण्यात आली, पण ती निगेटिव्ह आली आहे. डॉक्टरांना भीती आहे की, महिला Disease X ची पहिली रुग्ण आहे. 

प्रोफेसर जीन यांनीच पहिल्यांदा रहस्यमय विषाणूच्या पीडितेचा ब्लड सॅम्पल घेतला होता, त्यानंतर त्याला इबोला असं नाव देण्यात आलं होतं. इबोला झाल्यानंतर पहिल्यांदा रक्त येऊ लागते, त्यानंतर रुग्णाचा मृत्यू होतो. जीन यांनी रक्ताचे नमुने बेल्जियम आणि अमेरिकेत पाठवले होते. त्यात एक वर्मच्या आकाराचा विषाणू सापडला होता.  

"दोन्ही लशी 110 % टक्के सुरक्षित; नपुसंकत्वाच्या अफवा खुळचट"

आतापर्यंत यलो फीवर, इंफ्लुएंजा, रेबीज आणि अन्य आजार प्राण्यांपासून माणसांमध्ये आले आहेत. अधिकतर आजार उंदरांपासून आले आहेत. यात प्लेगसारख्या महा भयानक महामारीचा समावेश होतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार प्राण्यांचा रहिवास नष्ट केला जात आहे, तसेच वन्य प्राण्यांच्या व्यापार वाढला आहे. त्यामुळे प्राण्यांमधून विषाणूचा प्रसार वाढला आहे. सार्स, मर्स आणि कोरोना विषाणूही प्राण्यांपासून माणसामध्ये आला होता. 

ब्रिटनच्या एडिनबर्ग विश्वविद्यालयाच्या शोधानुसार, दर तीन ते चार वर्षांच्या अंतराने जगात एक नवा विषाणू येत असतो. अधिकतर विषाणू प्राण्यामधून माणसामध्ये येतात. जंगली प्राण्यांना मारण्यात आले किंवा त्यांचा खाण्यात समावेश वाढवण्यात आला तर इबोला आणि कोरोनासारख्या महामारी वाढत राहणार आहेत. विशेष करुन जिवंत प्राण्यांचे मास टिकवून ठेवल्याने धोका वाढतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctor who discovered ebola warns new deadly virus disease x