Video: महिला घोरत असताना तोंडात शिरला साप...

वृत्तसंस्था
Friday, 4 September 2020

एक महिला घराबाहेर झोपली असताना घोरत होती. घोरताना तोंड उघडे राहिल्यामुळे सापाने तोंडातून पोटात प्रवेश केला. घशामध्ये हालचाल होऊ लागल्यानंतर महिलेला जाग आली.

मॉस्को : एक महिला घराबाहेर झोपली असताना घोरत होती. घोरताना तोंड उघडे राहिल्यामुळे सापाने तोंडातून पोटात प्रवेश केला. घशामध्ये हालचाल होऊ लागल्यानंतर महिलेला जाग आली. डॉक्टरांनी उपचारादरम्यान सापाला बाहेर काढले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Video: गाढवाच्या तोंडात अडकला साप अन्...

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दागिस्तान येथील एक महिला आपल्या घराच्या अंगणात झोपली होती. झोपेत असताना घोरू लागल्यानंतर तोंड उघडे राहिले. यावेळी महिलेच्या तोंडातून 4 फूट लांबीचा साप शिरला. घशातून खाली जाऊ लागल्यानंतर हालचालीमुळे तिला जाग आली. घाबरल्यामुळे ओरडताही येत नव्हते. नातेवाईकांनी पाहिल्यानंतर डॉक्टरांना बोलावले. डॉक्टर घरी आल्यानंतर त्यांनी कौशल्य पणाला लावत सापाला महिलेच्या तोंडामधून बाहेर काढले. विशेष म्हणजे महिला आणि सापाला कोणत्याही प्रकारची इजा झाली नसून, दोघेही जिवंत आहेत. उपस्थितांनी संबंधित घटना मोबाईलमध्ये कैद केली असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नेटिझन्स डॉक्टरचे अभिनंदन करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctors pulling snake out of womans throat video viral