
गेल्या चार दिवसात पाकिस्तानमध्ये दोन वेळा भूकंप झाला. याआधीही अनेकदा पाकिस्तानला भूकंपाचे सौम्य आणि मध्यम तीव्रतेचे धक्के बसले आहेत. दरम्यान, आता पाकिस्तान गुप्तपणे अणुचाचण्या करत असल्यानं भूकंपाचे धक्के बसत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. यातच आता एका संशोधनाचा दाखला त्यासाठी दिला जात आहे. अणुचाचण्यांमुळे भूकंपाच्या प्रमाणात वाढ होऊ शकते असं म्हटलं गेलं होतं.