esakal | मेहुल चोक्सीला मोठा झटका; डोमिनिकाच्या कोर्टानं ठरवलं 'अवैध अप्रवासी'
sakal

बोलून बातमी शोधा

मेहुल चोक्सीला मोठा झटका; डोमिनिकाच्या कोर्टानं ठरवलं 'अवैध अप्रवासी'

मेहुल चोक्सीला मोठा झटका; डोमिनिकाच्या कोर्टानं ठरवलं 'अवैध अप्रवासी'

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ होण्याची चिन्हं आहेत. आता डोमिनिकाच्या सरकारने मेहुल चोक्सीला Prohibited Immigrant म्हणजेच अवैध अप्रवासी (बेकायदेशीररित्या स्थलांतरित) म्हणून घोषित केलं आहे. डोमिनिकाच्या सरकारने 25 मे रोजी याबाबतचा आदेश जारी केला होता.

हेही वाचा: Video: लाइव्ह कार्यक्रमात महिलेने खासदाराला लगावली श्रीमुखात

मेहुल चोक्सी भारतातून पळून गेल्यानंतर अँटीग्वा देशामध्ये राहत होता. तो 23 मे रोजी डोमिनिका या शेजारच्या देशात गेला होता. त्याठिकाणी पोलिसांनी त्याला अटक केली. मेहुलने आपल्या जामिनासाठी याचिका दाखल केली आहे, मात्र, यासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाहीये.

पीएनबी घोटाळ्यातील आरोपी

मेहुल चोक्सी हा 13,500 कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्यातील आरोपी आहे, त्याच्या विरोधात अटकेसाठी वॉरंट काढण्यात आलं होतं मात्र, तो त्या दरम्यानच अँटीग्वाला पळून गेला होता. तपास यंत्रणांनी त्याला फरार घोषित केलं होतं. मेहुलने अँटीग्वा आणि बारबुडामध्ये खूप मोठी गुंतवणूक केली आहे. त्याने त्या ठिकाणचीच नागरिकता स्विकारली आहे. त्याला नोव्हेंबर 2017 मध्ये कॅरेबियाई राष्ट्राद्वारे गुंतवणूक कार्यक्रमाअंतर्गत नागरिकता प्रदान करण्यात आली आहे. मात्र, आता त्याची ही नागरिकता रद्द करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

हेही वाचा: गरीब देशांना अमेरिका देणार फायजरची लस; 50 कोटी डोस खरेदीची तयारी

डोमिनिकाला येऊन भारतीय अधिकाऱ्यांनी करावी चौकशी

अलिकडेच चोक्सीने डोमिनिकाच्या हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. त्याने भारतीय अधिकाऱ्यांसमोर एक ऑफर ठेवली आहे. चोक्सीने म्हटलंय की, भारतीय अधिकारी माझी चौकशी करण्यासाठी डोमिनिकाला येऊ शकतात. एवढंच नव्हे तर त्याने दावा केलाय की तो फक्त आपल्या उपचारांसाठी भारत सोडून आला होता. मी कायद्याचं पालन करणारा नागरिक आहे, असंही त्यानं म्हटलंय.