esakal | गरीब देशांना अमेरिका देणार फायजरची लस; 50 कोटी डोस खरेदीची तयारी
sakal

बोलून बातमी शोधा

गरीब देशांना अमेरिका देणार फायजरची लस; 50 कोटी डोस खरेदीची तयारी

गरीब देशांसमोर लशीचा प्रश्न आहे. त्यासाठी कोव्हॅक्स अंतर्गत लसपुरवठा केला जातो. आता यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी मोठी घोषणा केली आहे.

गरीब देशांना अमेरिका देणार फायजरची लस; 50 कोटी डोस खरेदीची तयारी

sakal_logo
By
सूरज यादव

वॉशिंग्टन - कोरोनाच्या संकटाने गेल्या दीड-दोन वर्षात जगात मोठा हाहाकार माजवला आहे. यातून आता हळू हळू काही देश बाहेर पडत आहेत. इस्राईलने नुकतंच कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेला आता जगभरात सुरुवात झाली आहे. मात्र गरीब देशांसमोर लशीचा प्रश्न आहे. त्यासाठी कोव्हॅक्स अंतर्गत लसपुरवठा केला जातो. आता यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी मोठी घोषणा केली आहे. कोव्हॅक्सअंतर्गत कमी उत्पन्न असलेले 92 देश आणि आफ्रिकन संघाला पुढच्या वर्षी लस देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी फायजरच्या 50 कोटी लशीचे डोस खरेदी करणार आहे.

शिखर परिषद सुरु होण्याच्या आधी ज्यो बायडेन याबाबतची घोषणा करतील. लशीच्या 20 कोटी डोसची खेरदी करून यावर्षीच ते देण्यात येईल. तर उर्वरित डोस 2022 च्या पहिल्या सहा महिन्यात दिली जातील. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झेक सुलीवन यांनी बुधवारी सांगितलं की, बायडेन यांनी लस पुरवठ्यासाठी कटिबद्धता दर्शवली आहे. हा अमेरिकेच्या सार्वजनिक आरोग्य आणि रणनितीच्या अंतर्गत घेण्यात आलेला निर्णय आहे.

हेही वाचा: बायडेन यांचा मोठा निर्णय; ट्रम्प यांच्या आदेशाला केराची टोपली

अमेरिकेला लस पुरवठ्यासाठी जागतिक योजनेचा आराखाडा तयार करण्याबाबत दबाव सहन करावा लागला. जून अखेरपर्यंत जगभरात 8 कोटी डोस देण्यात येतील. यामध्ये बहुतांश डोस हे कोव्हॅक्स अंतर्गत दिले जातील. जगभरात कोरोनाची आकडेवारी वाढत असताना ही घोषणा बायडेन यांनी केली आहे.

हेही वाचा: Video: लाइव्ह कार्यक्रमात महिलेने खासदाराला लगावली श्रीमुखात

जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने दिलेल्या आकडेवारीनुसार जगभरात कोरोनाचे एकूण रुग्ण 17.43 कोटी इतके झाले आहेत. तर मृत्यू झालेल्यांची संख्या 37.5 लाखांवर पोहोचली आहे. जगात सर्वाधिक अमेरिकेत 3 कोटी 34 लाख 13 हजार 999 रुग्ण आढलले तर 5 लाख 98 हजार 760 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेला सर्वाधिक कोरोनाचा फटका बसला. मृत्यूच्या बाबतीत अमेरिकेनंतर ब्राझीलचा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये 4 लाख 79 हजार 515 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर भारतात 3 लाख 53 हजार 528 जणांचा मृत्यू झाला आहे.