ट्रम्प यांच पराभवाच दुखणं; आता औषध कंपन्यांवर फोडलं खापर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव पदरी पडलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.

वॉशिग्टंन : अमेरिकेच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करायला लागलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोप केलाय की, मोठ्या औषधनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी अलिकडेच झालेल्या निवडणुकीदरम्यान लाखो डॉलर्स खर्च करुन त्यांच्याविरोधात नकारात्मक मोहिम चालवली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव पदरी पडलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.

हेही वाचा - पाकिस्तानात सापडलं 1300 वर्षे जुनं मंदिर; हिंदू शाही काळाच्या खाणाखुणा अजूनही ताज्या

मात्र, माजी उपराष्ट्राध्यक्ष आणि डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी पेन्सिल्व्हेनिया, मिशीगन आणि विस्काँन्सिसमधील  विजयानंतर सात नोव्हेंबर रोजी त्यांना विजेता घोषित करण्यात आलं. बायडन यांचा विजय अमान्य करत मीच जिंकलो आहे, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी छातीठोकपणे केला होता. त्यांनी निवडणुकीची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवली गेली असल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी व्हाईट हाऊसमधील पत्रकारांशी बोलताना म्हटलं की, प्रचाराच्या दरम्यान मोठ्या औषध कंपन्यांनी लाखों डॉलर खर्च करुन माझ्या बदनामीची मोहिम चालवली आहे. तसं तर मी या निवडणुकीत जिंकलो आहे. जवळपास 7.5 कोटी मतांनी मी विजयी झालो असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 

हेही वाचा - अभिमानास्पद! भारतीय वंशाच्या माला अडिगांची 'बायडेन टीम'मध्ये महत्त्वाच्या पदावर नियुक्ती

बायडेन यांना 306 इलेक्टोरल व्होट्स मिळाले आहेत तर ट्रम्प यांना फक्त 232 इलेक्टोरल व्होट्स प्राप्त झाले आहेत. व्हाईट हाऊसवर विजय मिळवण्यासाठी कमीतकमी 270 इलेक्टोरल व्होट्सची गरज असते. ट्रम्प यांनी म्हटलं की, मोठ्या औषधनिर्मिती करणाऱ्या कंपन्या आमच्या विरोधात आहेत. मीडिया आमच्या विरोधात आहे. तंत्रज्ञानातील मोठे लोक देखील आमच्या विरोधात आहेत. मोठ्या कंपन्यांनी आमच्या बदनामीसाठी लाखो डॉलर खर्च केले आहेत. ट्रम्प यांनी यादरम्यान अमेरिकन लोकांसाठी पावतीवर लिहलेल्या औषधांच्या किंमती कमी करण्याच्या नियमांसंबंधी देखील घोषणा केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: donald trump alleged big drug companies run advertisements against me for defeating me