ट्रम्प म्हणतात, 'माझ्यावर अन्याय झाला'

वृत्तसंस्था
Tuesday, 24 September 2019

निष्पक्षपणे नोबेल पुरस्कार दिला गेला असता तर मला आज अनेक गोष्टींसाठी हा पुरस्कार मिळाला असता. मात्र, त्यांनी असे केले नाही. नोबेल पुरस्कार मला न दिल्याने हा माझ्यावर झालेला एकप्रकारे अन्यायच आहे.

- डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका

न्यूयॉर्क : नोबेल पुरस्कार न मिळाल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या नाराज आहेत. त्याचसंदर्भात त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. ते म्हणाले, निष्पक्षपणे नोबेल पुरस्कार दिला गेला असता तर मला आज अनेक गोष्टींसाठी हा पुरस्कार मिळाला असता. मात्र, त्यांनी असे केले नाही. नोबेल पुरस्कार मला न दिल्याने हा माझ्यावर झालेला एकप्रकारे अन्यायच आहे.

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी ही भावना बोलून दाखवली. ते म्हणाले, जगभरातील लोकांमध्ये सहकार्याची भावना अधिक सक्षम करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी नोबेल पुरस्कार देण्यात येतो. मात्र, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी शांततेचा नोबेल पुरस्कार न मिळणे हा आपल्यावर झालेला अन्याय आहे, असे सांगितले.

"साताऱ्यात राष्ट्रवादीच ठरलं?; उदयनराजेंविरोधात 'हे' लढणार

तसेच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी काश्मीरप्रश्नी तोडगा काढावा. हे दोन्ही देशांसाठी फायद्याचे ठरेल, असा मार्ग काढून काश्मीर प्रश्न सोडवण्यात यावा. प्रत्येक समस्या सोडवली जाऊ शकते. समस्येतून मार्ग निघू शकतो, असेही ते म्हणाले.

ओबामा यांना नोबेल कशासाठी ?

यापूर्वी 2009 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र, ओबामा यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात आला हे त्यांनाही माहीत नव्हते, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

Video : ...तर मी फॉर्मही भरणार नाही : उदयनराजे

काश्मीरप्रश्नी मध्यस्थीसाठी तयार

भारत, पाकिस्तान सहमत असल्यास काश्मीरच्या मुद्द्यावर मी मध्यस्थी करण्यास आम्ही तयार आहोत, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donald Trump complains he deserves a Nobel prize