डोनाल्ड ट्रम्प यांना अखेर फेसबुकचा दणका

यूएनआय
Friday, 7 August 2020

शाळा सुरु करण्याचा संदर्भ
ट्रम्प यांच्या पोस्टवर तातडीने कारवाई व्हायचे कारण म्हणजे ती शाळेशी संबंधित होती. ट्रम्प म्हणाले होते की, शाळा आता सुरु झाल्या पाहिजेत असे माझे मत आहे. तुम्ही मुलांकडे पाहिली तर ती जवळपास नक्कीच कोरोनाविरुद्ध सक्षम झाली आहेत. ती जास्त ताकदवान झाली आहेत. यावर विश्वास ठेवणे कठीण आहे, पण तुम्हाला तसे जाणवत असेल असा माझा विश्वास आहे.

ह्युस्टन - कोरोनाची साथ जागतिक पातळीवर पसरल्यापासून वादग्रस्त विधाने केलेले अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सोशल मिडीयावर अखेर दणका बसला. कोविड-19 विषाणूला मुलांची प्रतिकारशक्ती जवळपास विकसित झाल्याचा दावा करणारी त्यांची पोस्ट व्हिडिओसह फेसबुक आणि ट्विटरने काढून टाकली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खातरजमा करावे किंवा तत्सम संदेशाने ही पोस्ट चिन्हांकित करण्याऐवजी ती काढून टाकणे फेसबुकने योग्य मानले. त्यानुसार हा मजकूर या घडीला उपलब्ध नाही असा संदेश त्या लिंकवर येतो.

वास्तविक आकडेवारीनुसार मुलांना कोरोनाचा धोका नाही असे म्हणता येत नाही.

चीनची क्षेपणास्त्र चाचणी; संपूर्ण भारत आणि अमेरिकेचं नौदल तळही होऊ शकतं टार्गेट

ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेच्या प्रसिद्धी विभागाच्या राष्ट्रीय उपप्रमुख कोर्टनी पॅरेल्ला यांनी फेसबुकला प्रत्यूत्तर दिले की, उघडउघड पक्षपाताचा हे ठळक उदाहरण आहे. नियमांची अंमलबजावणी एकतर्फी झाल्याचा आणखी एक दिवस उजाडला. सोशल मिडीया कंपन्या या सत्याचा शहनिशा करणारा लवाद नाही. लहान मुलांना कोरोना होण्याची शक्यता कमी असल्याची वस्तुस्थिती ट्रम्प सांगत होते.

कोविडबाबत चुकीच्या तसेच हानिकारक माहितीबाबत आम्ही धोरण ठरविले आहे. ट्रम्प यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमधील दावे खोटे आहेत. ते आमच्या धोरणाचा भंग करणारे आहेत.
- अँडी स्टोन, फेसबुक प्रवक्ते (धोरण)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: donald Trump finally hit by Facebook