esakal | डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने काश्मीरला दाखवलं पाकचा भाग
sakal

बोलून बातमी शोधा

donald trump jr

गेल्या फेब्रुवारीत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प भारतात आले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने काश्मीरला दाखवलं पाकचा भाग

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेची निवडणूक ही नेहमीच अटीतटीची मानली जाते. या बहुप्रतिक्षित निवडणुकीचे मतदान तीन नोव्हेंबर रोजी पार पडले. ही निवडणूक रिपब्लिक पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडेन यांच्यामध्ये होता आहे. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांच्या मोठ्या मुलाने 2020 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची भविष्यवाणी करत भारताचा चुकीचा नकाशा शेअर केला आहे. या नकाशामध्ये काश्मीरला पाकिस्तानचा भाग दाखवला आहे.

हेही वाचा - US election: 'गाढव' की 'हत्ती' कोण मारणार बाजी? जाणून घ्या 10 महत्त्वाच्या गोष्टी

निवडणुकीच्या निकालाची भविष्यवाणी करत डोनाल्ड ट्रम्प ज्यूनिअरने रिपब्लिकन पक्षाच्या रंगासोबत जगातील सर्वाधिक देश लाल रंगाने रंगलेले दाखवले आहेत. यामधून त्यांना हा संदेश द्यायचा आहे की,  त्यांचे वडील या निवडणुकीत विजयी होणार आहेत. आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या जगाच्या नकाशाच्या माध्यमातून त्यांनी ही भविष्यवाणी केली आहे. भारतासहीत अगदी काही देश सोडून त्यांनी संपूर्ण जगाला लाल रंगात दाखवले आहे म्हणजेच रिपब्लिक पक्षाचे समर्थक दाखवले आहे. 

भारत आणि चीनसारख्या देशांना त्यांनी निळ्या रंगात दाखवलं आहे. म्हणजेच हे देश डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडेन यांचे समर्थक आहेत, असं त्यांना सांगायचं आहे. ट्रम्प ज्यूनिअर यांनी ट्विट केलं आहे की, ठिक आहे, सरतेशेवटी माझा निवडणुकीचा नकाशा भविष्यवाणी करण्यासाठी तयार झाला आहे. ट्रम्प ज्यूनिअर यांच्याद्वारे ट्विट केल्या गेलेल्या नकाशामध्ये, भारतासह चीनला निळ्या रंगात चित्रित केलं गेलं आहे. 
मात्र, या नकाशात भारतातील काश्मीरला पाकिस्तानचा भाग दाखवलं गेलं आहे. यावरुन टीका होत आहे. काश्मीर हा भारताचा भाग आहे. पाकव्याप्त काश्मीरवरुन गेल्या अनेक दशकांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये सातत्याने वाद सुरु आहे. हे प्रकरण जागतिक पटलावर सातत्याने चर्चेला असते. अशातच ट्रम्प यांच्या मुलाने काश्मीरला थेट पाकिस्तानचा भाग दाखवणे चूकीचे असल्याचे मत मांडले जात आहे.

हेही वाचा - US Election : चुरशीच्या मतदानाला प्रारंभ; मध्यरात्री नोंदवले गेले पहिले मत

गेल्या फेब्रुवारीत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प भारतात आले होते. नरेंद्र मोदींनी त्यांना मित्र म्हणत एकप्रकारे या निवडणुकीसाठी आपले समर्थनच जाहीर केले  होते. मात्र, असं असतानाही डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाचे हे ट्विट चर्चेचा विषय ठरले आहे.