Donald Trump Tariff onTrucks

Donald Trump Tariff onTrucks

ESakal

Donald Trump Tariff Policy : डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब, आता 'या' क्षेत्राला केले लक्ष्य; १ नोव्हेंबरपासून जगभरात होणार लागू

US Tariff Policy : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जगभरातील अनेक देशांवर टॅरिफ वाढवले आहेत. १ नोव्हेंबर २०२५ पासून, अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व मध्यम आणि अवजड ट्रकवर २५% टॅरिफ लागू होईल.
Published on

Summary

फर्निचर, कॅबिनेट, व्हॅनिटीज, लाकूड यांसारख्या वस्तूंवरील शुल्क २५% ते ५०% पर्यंत वाढवण्यात आले आहे.
यापूर्वीच स्टील, अॅल्युमिनियम, तांबे, ऑटोमोबाईल्स आणि पार्ट्सवरही २५%-५०% टॅरिफ वाढवण्यात आले होते.
भारतासह अनेक देशांवर १०%-४०% पर्यंत अतिरिक्त देश-विशिष्ट शुल्क लादले गेले आहे, “लिबरेशन डे टॅरिफ” योजनेअंतर्गत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जगातील अनेक देशांवर टॅरिफ बॉम्ब टाकला आहे. यावेळी त्यांनी मध्यम आणि अवजड ट्रक क्षेत्राला लक्ष्य केले आहे. ट्रम्प यांच्या मते, हा नवीन टॅरिफ १ नोव्हेंबरपासून जगभरात लागू केला जाईल. ट्रम्प यांच्या आदेशानुसार, अमेरिका परदेशातून आयात केलेल्या सर्व मध्यम आणि अवजड ट्रकवर २५ टक्के टॅरिफ लादेल. त्यांनी ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे की १ नोव्हेंबर २०२५ पासून इतर देशांमधून अमेरिकेत आयात केलेल्या सर्व मध्यम आणि जड ट्रक्सवर २५ टक्के टॅरिफ लादले जाईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com