
India Is a Great Nation Says Donald Trump Praising PM Modi Before Pakistan Leaders
Esakal
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी इजिप्तमध्ये गाझातील शांतीसंदर्भात आयोजित परिषदेत भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. ट्रम्प म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान आता खूप चांगले एकत्र राहतील. यावेळी व्यासपीठावर मागे उभा असलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शाहबाज शरीफ यांच्याकडे वळून हो ना? असंही ट्रम्प यांनी विचारलं. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मान हलवून होकार दिला. या कार्यक्रमात ट्रम्प यांच्या विधानांमुळे हलकं फुलकं वातावरण होतं. सोशल मीडियावरही याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.