
डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की त्यांनी भारत–पाकिस्तानमधील अणुयुद्ध काही तासांवर असताना थांबवले.
त्यांनी सांगितले की इराणच्या अणुतळांवर अमेरिकेने यशस्वी बॉम्बहल्ला केला होता.
युक्रेन युद्धाबाबत ते म्हणाले की अमेरिका आता युक्रेनऐवजी नाटोशी व्यवहार करते आणि युद्ध संपवणे त्यांचे ध्येय आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील अणुयुद्ध रोखले आहे. सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की मी 'हुकूमशहा' नाही तर 'खूप बुद्धिमान' व्यक्ती आहे. ट्रम्प यांनी ट्रम्प यांनी असेही म्हटले की त्यांनी इराणच्या अणु तळांवर बॉम्बस्फोट करण्याची यशस्वी कारवाई केली होती.