तात्काळ राजीनामा द्या नाहीतर महाभियोग आणू; ट्रम्प यांना इशारा

टीम ई सकाळ
Saturday, 9 January 2021

ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदावरून हटवायला हवं. मग त्यासाठी 25 व्या सुधारीत कायद्याचा किंवा महाभियोग आणावा लागला तरी चालेल. ट्रम्प व्हाइट हाऊसमध्ये असणं अमेरिकेच्या धोक्याचं असल्याचं नेत्यांनी म्हटलं.

वॉशिंग्टन - अमेरिकन प्रतिनिधींच्या सभेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी म्हटलं की, जर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थकांनी कॅपिटलमध्ये घुसून घातलेल्या गोंधळा प्रकरणी तात्काळ राजीनामा द्यावा.नाहीतर त्यांच्याविरोधात हकालपट्टीसाठी महाभियोग आणण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल अशा इशारासुद्धा त्यांनी दिला आहे. 

तीन नोव्हेंबरला झालेल्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या पराभवानंतर जो बायडेन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून 20 जानेवारीला शपथ घेणार आहेत. पेलोसी आणि डेमोक्रॅट नेत्यांनी असं मत व्यक्त केलं आहे की, बुधवारी कॅपिटॉल बिल्डिंग संसदेत ट्रम्प समर्थक घुसल्याच्या घटनेनंतर ट्रम्प यांना तात्काळ पदावरून हटवण्यात यावं. 

हे वाचा - 'आम्ही नाही जा';, ट्रम्प यांचा हेका कायम; बायडन यांच्या शपथविधीला राहणार अनुपस्थित

पेलोसी यांनी शुक्रवारी म्हटलं होतं की, सदस्यांना आशा आहे की, ट्रम्प तात्काळ राजीनामा देतील. जर त्यांनी असं केलं नाही तर आम्ही रुल्स कमिटीला आदेश दिले आहेत की, खासदार जेमी रस्किन यांचा 25 व्या संशोधनानुसार महाभियोगाचा प्रस्ताव पुढे मांडला जावा.

हाउस डेमोक्रेटिक कॉकस यांनी या मुद्द्यावर अनेक तास झालेल्या चर्चेनंतर म्हटलं की, नियमानुसार सदनाच्या सर्व पर्यायांना सुरक्षित ठेवलं जाईल. यामध्ये 25 वी घटनादुरुस्ती, महाभियोग प्रस्ताव आणि महाभियोगासाठी विशेषाधिकाराचा प्रस्ताव यांचाही समावेश आहे. 

हे वाचा - शक्तीशाली ट्रम्प यांच्यावर अटकेची टांगती तलवार; उरले दोनच पर्याय

भारतीय वंशाच्या अमेरिकन खासदार प्रमिला जयपाल यांनी सांगितलं की, महाभियोग प्रकिया लगेच सुरु करायला हवी. खासदार कइयालीई यांनी म्हटलं की, ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदावरून हटवायला हवं. मग त्यासाठी 25 व्या सुधारीत कायद्याचा किंवा महाभियोग आणावा लागला तरी चालेल. ट्रम्प व्हाइट हाऊसमध्ये असणं अमेरिकेच्या धोक्याचं असल्याचं नेत्यांनी म्हटलं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: donald-trump-resign-immediately-impeachment-nancy-pelosi warns