#HowdyModi ट्रम्प म्हणतात, 'अमेरिकेचे भारतावर प्रेम...!'

टीम ईसकाळ
Monday, 23 September 2019

मोदींनी कार्यक्रमानंतर ह्यूस्टनवासियांचे आभार मानत एक ट्विट केले. 'तुमच्या या प्रेमासाठी ह्यूस्टनवासियांचे आभार!' असे ट्विट मोदींनी केले.

ह्यूस्टन : अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातल्या ह्यूस्टन शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'हाऊडी मोदी' हा कार्यक्रम प्रचंड गाजला. या कार्यक्रमाची जगभरात चर्चा सुरू आहे. तब्बल 75 हजार अमेरिकन व भारतीय नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पूर्णवेळ कार्यक्रमाला उपस्थिती होती. त्यांनी ट्विटवरून मोदींचे अभिनंदन केले आहे.

दहशतवादाविरोधात निर्णायक लढ्याची वेळ : मोदी 

मोदींनी कार्यक्रमानंतर ह्यूस्टनवासियांचे आभार मानत एक ट्विट केले. 'तुमच्या या प्रेमासाठी ह्यूस्टनवासियांचे आभार!' असे ट्विट मोदींनी केले. या ट्विटमध्ये त्यांचा कार्यक्रमातील एक व्हिडिओही शेअर केलाय. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींचे ट्विट रिट्विट करत 'अमेरिकेचे भारतावर प्रेम आहे!' असे ट्विट केले आहे. यामुळे मोदी व ट्रम्प यांच्यातील मैत्री वाढली आहे यात शंकाच नाही. 

#HowdyModi : अमेरिकेत ह्युस्टनमध्ये मोदी आणि फक्त मोदी!

दहशतवादाविरोधात निर्णायक लढ्याची वेळ : मोदी 
"भारताने आता विकासाची वाट धरली असून, भारत न्यू इंडियाच्या दिशेने जात आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाच्या व्यासपीठावर भारताची प्रतिमा आणखी उंचवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर जगात आता दहशतवादा विरोधात निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हा लढा देत आहेत. त्यांना पाठिंबा देण्याची ही वेळ आहे, असे मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: donald trump retweets modi s tweet and says USA loves India