हा तर वेळेचा अपव्यय; ट्रम्प यांच्या नकारानंतर प्रेसिडेन्शियल डिबेट रद्द

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 October 2020

नोव्हेंबर महिन्यात पार पडणाऱ्या या निवडणुकीआधी तीन प्रेसिडेंशियल डिबेट्स होणं नियोजित आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणुक म्हणजे सगळ्या जगासाठीच दखलपात्र विषय. या निवडणुकीत काय घडतंय आणि काय नाही, यासंबधीची उत्सुकता सतत असते. येणाऱ्या निवडणुकीत रिपब्लिक पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटीक पक्षाचे जो बायडेन हे आमनेसामने आहेत. नोव्हेंबर महिन्यात पार पडणाऱ्या या निवडणुकीआधी तीन प्रेसिडेंशियल डिबेट्स होणं नियोजित आहे. मात्र, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महत्त्वाचं असलेलं डिबेट आता रद्द करण्यात आलं आहे. 

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डिबेट म्हणजे वेळेचा अपव्यय असल्याचं सांगत व्हर्च्युअल डिबेटमध्ये सहभागी होण्यास नकार दिला. त्यामुळे जो बायडेन यांच्यासोबत पुढच्या आठवड्यात होणारे दुसरे डिबेट रद्द करण्यात आल्याची माहिती आयोगाने दिली आहे. सर्व उमेदवारांनी आपल्या त्यादिवशीच्या योजनेबाबत आयोगाला माहिती दिली आहे. प्रेसिडेंशियल डिबेट्समधील तिसरी आणि अंतिम डिबेट 22 ऑक्टोबर रोजी नॅशविले, टेनेसीमध्ये नियोजित आहे. 

हेही वाचा - ॲरिझोनाला कमला हॅरीस यांची साद

याआधी आयोगाने गुरुवारी घोषणा केली होती की 15 ऑक्टोबर रोजी ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यादरम्यान व्हर्च्युअल डिबेट होईल. रिपब्लिक पक्षाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कोरोना संक्रमित झाल्यामुळे हरतऱ्हेची काळजी आणि सावधानी बाळगली गेली होती. परंतु, आता राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या डिबेटमध्ये भाग घेण्यास नकार दिला आहे. 

हेही वाचा - ...तर कमला हॅरिस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होतील - डोनाल्ड ट्रम्प

1976 नंतर झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या प्रत्येक निवडणुकीची एक खासियत राहिलेली आहे. ती म्हणजे राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुक प्रचाराच्या अभियानादरम्यान राष्ट्राध्यक्ष पदासाठी डिबेट होते. 2000 सालानंतर तर निवडणुकीआधी तीन डिबेट्स होण्याची परंपरा सुरु झाली आहे. बायडेन यांनी म्हटलं होतं की, ते ट्रम्प यांच्यासोबत वैयक्तिग्क पातळीवर जाऊन डिबेट करु इच्छित नाहीत. बायडेन यांचे एंड्रयू बेट्स यांनी म्हटलं की, ही लाजिरवाणी गोष्ट आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी एकमात्र अशा डिबेटला अर्थहिन केलं जिथे मतदार प्रश्न विचारतात. मात्र, ही काही आश्चर्याची गोष्ट नाहीये. कारण ट्रम्प यांच्याकडे मतदारांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची हिंमतच नाहीये. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोनापासून मुक्त झाल्यावर व्हाईट हाऊसमध्ये आपला पहिला लाईव्ह कार्यक्रम ठेवणार असल्याचीही माहिती आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donald Trump take decision to cancel presidential debate