...तर कमला हॅरिस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होतील - डोनाल्ड ट्रम्प

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूका अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. अमेरिकेच्या निवडणुका या फक्त अमेरिकेवर नाही तर जगावरच प्रभाव टाकणाऱ्या ठरतात. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपली खुर्ची टिकवून ठेवू शकतील का, हे पाहणं रंजक ठरणारे. निवडणुकीच्या आधीच ट्रम्प यांना कोरोना झाल्यामुळे शंका-कुशंकाचेही वातावरण आहे. निवडणुकीच्या आधी होणाऱ्या तीन प्रेसिडेंशियल डिबेटपैकी एक डिबेट पार पडली आहे. मात्र, आणखी दोन डिबेट या नियोजित आहेत. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 

हेही वाचा - दक्षिण चिनी समुद्रातील चीनच्या हालचालींवर नाटोचे लक्ष हवे
जर डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडेन 3 नोव्हेंबरला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणुक जिंकले तर त्यांच्यासोबत उपराष्ट्राध्यक्ष म्हणून असलेल्या कमला हॅरिस या एका महिन्यातच राष्ट्राध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळतील. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यांनी गुरुवारी आपल्या विरोधकांवर हल्ला करताना हे वक्तव्य केलं आहे. 
उपराष्ट्रपती माईक पेन्स आणि कमला हॅरिस यांच्या दरम्यान बुधवारी उपराष्ट्रपती पदासाठी डिबेट झाली. यामध्ये कोरोना महामारी, बेरोजगारी, चीन, वर्णद्वेषाचा मुद्दा या साऱ्या मुद्यांवर ट्रम्प यांनी कशापद्धतीने परिस्थिती हाताळली याविषयावर चर्चा घमासान चर्चा झाली. 

हेही वाचा - अमेरिकन कवयित्री लुईस ग्लूक यांना साहित्यातील नोबेल
ट्रम्प यांनी म्हटलं की कमला हॅरिस या एक कम्युनिस्ट आहेत. जो बायडेन हे राष्ट्राध्यक्ष म्हणून दोन दिवस देखील टिकणार नाहीत. ट्रम्प यांनी पुढे म्हटलं की, कमला हॅरिस या समाजवादी नाहीयत तर त्या कम्युनिस्ट आहेत. त्यांच्या विचारधारेवर एक नजर टाकली तर त्या खुनी आणि बलात्कारी लोकांना आपल्या देशात घुसण्यासाठी देशाच्या सीमा उघडू इच्छित आहेत. 

ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच गरमागरम झाले आहे. येणाऱ्या प्रेसिडेंशिय डिबेटच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य महत्वपूर्ण ठरणार असल्याचं बोललं जात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: trump says if biden wins kamala will replace him in month