
पैशाचा पाऊस पाहून काही लोकांनी त्याचा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली.
बिजिंग: असं म्हटलं जातं की अंमली पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी घातक असते. एकाने त्याचं सेवन करावं आणि फायदा दुसऱ्यांनाच व्हावा हे ऐकायला थोडं वेगळंच वाटत ना? पण काही दिवसांपुर्वी अशीच एक घटना चीनमध्ये घडली आहे. चीनमधील एका व्यक्तीने अमली पदार्थाचे सेवन करुन असं काही कृत्य केलं आहे की त्यामुळे पोलिसही चक्रावले आहेत.
चीनमधील बो या 29 वर्षीय इसमाने मोठ्या प्रमाणात 'मेथ' नावाचे ड्रग्ज घेतल्यानंतर बाल्कनीतून चक्क पैसे उडवायला सुरुवात केली. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाशातून येत असलेल्या पैशांच्या पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. कारण लोकं पैशे उचलण्यासाठी झगडताना दिसली. बो याच्या अजब कृत्याबद्दल या इसमाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर अंमली पदार्थांचे सेवन करून गैरप्रकार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Corona Updates: दिलासादायक! कोरोनाचा प्रभाव ओसरतोय; रुग्णसंख्या 40 हजारांच्या खाली
दक्षिण-पश्चिम चीनमधील शॉपिंगबा येथे काही दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे. चीनच्या ट्विटरसारख्या मायक्रोब्लॉगिंग सर्व्हिसवर चिनी पोलिसांनी याबद्दलची अधिक माहिती देताना सांगितले आहे की, दुपारी दीडच्या सुमारास शॉपिंगबा जिल्ह्यातील बो या 29 वर्षीय तरुणाने आपल्या घरात मेथड्रग्जचं सेवन मोठ्या प्रमाणात केलं होतं. नंतर बोने नशेत आपल्या बाल्कनीतून पैसे फेकायला सुरुवात केली. जे पैसे रस्त्यावर पडू लागले, त्यामुळे बरेच जण गाडीतून उतरुन ते पैसे गोळा करू लागले. या प्रकरणामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाले होते.
Vienna Terror Attack: दहशतवादी हल्ल्यामुळे धक्का, भारत ऑस्ट्रियाबरोबर-PM मोदी
बो आपल्या ३० व्या मजल्यावरील अपार्टमेंटमधून पैसे फेकत होता. पैशाचा पाऊस पाहून काही लोकांनी त्याचा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र, बोने आपल्या बाल्कनीतून किती पैसे फेकले हे प्रशासनाने अद्याप जाहीर केलेले नाही. बोने फेकलेले पैसे लोकं माघारी देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
(edited by- pramod sarawale)