एलॉन मस्कचा पुन्हा इशारा; बनावट-स्पॅमचा तपशील द्या अन्यथा...

Elon Musk
Elon MuskSakal

टेस्ला आणि स्पेसएक्सचे संस्थापक एलॉन मस्क यांनी ट्विटरला पुन्हा एकदा कठोर शब्दात इशारा दिला असून, ट्वीटरने स्पॅम आणि बनावट खात्यांशी संबंधित डेटा न दिल्यास ट्वीटर खरेदीसाठी करण्यात आलेला 44 अब्ज डॉलर्सचा करार रद्द केला जाईल असे सांगितले आहे.

एलॉन मस्क ट्विटर सोबतचा करार रद्द करू शकतात. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मस्क यांनी ट्विटर हे स्पॅम आणि बनावट खात्यांबद्दल माहिती न देऊन तक्रार त्यांच्यातील कराराचे उल्लंघन करत असल्याचा आरोप केला आहे. मस्क यांनी सोशल मीडिया कंपनी ट्विटरला स्पॅम किंवा फेक अकाऊंटची माहिती शेअर करण्यास सांगितले होते. मस्क यांनी ट्विटरवर यूजर अकाउंट्सचा डेटा लपवल्याचा आरोप केला आहे. मस्कने इशारा दिला आहे की ते ट्विटर विकत घेण्यासाठीचा त्यांचा $ 44 अब्ज रकमेचा करार रद्द करू शकतात.

Elon Musk
राज्यातील मॉन्सून ७ ते १० दिवस लांबण्याची शक्यता - IMD

पत्रात काय म्हटले होते

ट्विटर आपल्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करत असल्याचे मस्कच्या वकिलांच्या पत्रात म्हटले आहे. मस्क यांनी करार संपुष्टात आणण्याचे सर्व अधिकार राखून ठेवले आहेत. याआधी देखील मस्क यांनी सांगितले होते की मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर डील काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. एलॉन मस्क सोशल मीडिया कंपनीकडून बनावट किंवा स्पॅम खात्यांची संपूर्ण माहिती मिळण्याची वाट पाहत आहेत.

Elon Musk
...पण कचराकुंडीवर भारताच्या पंतप्रधानाचा फोटो लावणं अमान्य - जितेंद्र आव्हाड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com