Ethiopia News| इथिओपियात अंदाधुंद गोळीबार, ३२० जणांचा मृत्यू

माथेफिरुंच्या हल्ल्यात मृतांचा आकडा वाढला आहे.
Ethiopia News
Ethiopia Newsesakal

इथिओपियाच्या पश्चिमेकडील ओरोमिया भागात काही माथेफिरुंच्या हल्ल्यात मृतांचा आकडा वाढला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार १८ जून रोजी जवळपास ३२० जण मारले गेले होते. इथिओपियात (Ethiopia) यामुळे आतापर्यंत हे सर्वात मोठे नरसंहार (Genocide) झाल्याचे सांगितले जात आहे. हल्ला टिगरेच्या उत्तर भागात एका संघर्षाशी संबंधित होते. हा संघर्ष नोव्हेंबर २०२० मध्ये सुरु झाला होता. यामुळे आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. (Ethiopia 320 People Killed By Gun Firing)

Ethiopia News
पुन्हा एकदा मुख्यमंत्री तोंडावर आपटले, आता कोण एकटे पडले : शालिनी ठाकरे

इथिओपियाच्या पंतप्रधानांकडून हल्ल्याचे निषेध

इथिओपियाचे पंतप्रधान अबी महमद यांनी ओरोमियामध्ये झालेल्या हल्ल्याला भयानक कृत्य सांगत. सदरील घटनेची निंदा केली आहे. मात्र हिंसक घटनेचा कोणताही तपशील दिला गेलेला नाही. निर्दोष नागरिकांवर हल्ले, अवैध आणि बाह्यशक्तींकडून उपजीविकेला नष्ट करणे योग्य नसल्याचे अहमद म्हणाले. ओरोमिया, इथिओपियाचे सर्वात मोठा जातीय समूह आहे. त्यांच्या बरोबर अन्य जातीय समुहांमध्ये राजकीय स्पर्धा आहे. केंद्र सरकारकडून होत असलेल्या उपेक्षेमुळे त्यांच्यात खदखद निर्माण झाली आहे. अबी ओरोमो आणि इथिओपियाचे पहिले पंतप्रधान आहे. काही ओरोमोसचे म्हणणे आहे की त्यांनी समुदायाचे हित सोडले आहे.

Ethiopia News
अभिनेत्री स्वरा भास्करने केले कन्हैय्या कुमारचे कौतुक, आज तर...

ओरोमो लिबरेशन आर्मी दोषी

दुर्घटना ओरोमियाच्या पश्चिमेकडील वोलेगातील गिंबी भागात घडली. एक रहिवाशीने सांगितले, २६० लोकांना मारले गेले. दुसऱ्याने सांगितले की ३२० लोक होते. नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव आपले नाव सांगण्यास नकार दिला. ओरोमिया राज्यातील सरकारने सांगितले, की ओरोमो लिबरेशन आर्मीला दोषी ठरवण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com