esakal | 16 युरोपियन देशांची कोविशिल्डला मान्यता - आदर पूनावाला
sakal

बोलून बातमी शोधा

adar-poonawalla

कोविशिल्ड लस घेतली तरी युरोपात जाणाऱ्या प्रवशांना अनेक निर्बंध आणि अटींचा सामना करावा लागत होता.

16 युरोपियन देशांची कोविशिल्डला मान्यता - आदर पूनावाला

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - भारतात कोरोना प्रतिबंधक लस तयार करणाऱ्या कोविशिल्ड लसीला युरोपातील अनेक देशांनी मान्यता दिली नव्हती. त्यामुळे कोविशिल्ड लस घेतली तरी युरोपात जाणाऱ्या प्रवशांना अनेक निर्बंध आणि अटींचा सामना करावा लागत होता. आता युरोपातील 27 पैकी 15 देशांनी कोविशिल्डला मान्यता दिल्याची माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांनी दिली आहे. जर्मनी, स्वित्झर्लंड आणि नेदरलँडसह 15 देशांकडून मान्यता मिळाली आहे.

आदर पूनावाला म्हणाले की, ज्या देशांनी आधीच मान्यता दिलीय त्यांना अर्ज करणार नाही. युरोप, अमेरिकेसह सर्वांना हे मान्य करावं लागेल की, कोविशिल्ड प्रभावी आहे, त्याला जागतिक आरोग्य संघटनेनं मान्यता दिली आहे.

युरोपिय मेडिकल एजन्सीने सांगितलं की, कोविशिल्डला मंजुरी देण्यासाठी त्यांना कोणत्याही प्राधिकरणाकडून अर्ज मिळालेला नाही. जवळपास दोन आठवड्या आधीच युरोपिय युनियनने ईयू कोविड डिजिटल प्रमाणपत्र जारी केलं आहे. त्याच्या आधारेच युरोपिय युनियनमधील देशांमध्ये प्रवास शक्य आहे. युरोपिय युनियममध्ये कोविशिल्डचे मूल्यांकन करण्यासाठी उत्पादक कंपनीला ईएमएला एक अर्ज द्यावा लागेल. तो अद्याप मिळालेला नाही असं EMA ने म्हटलं आहे.

हेही वाचा: लोकांचा जीव वाचवण्यात फेसबुक सहाय्यक; बायडेन यांना कंपनीचा रिप्लाय

युरोपियन देशांमध्ये कोणत्याही निर्बंधाशिवाय फिरण्यासाठी युरोपियन युनियनने चार लसींना मंजुरी दिली आहे. यामध्ये फायजर आणि बायोएनटेकची कॉमिरनेटी, मॉडर्नाची स्पाइकव्हॅक्स, एस्ट्राझेनका-ऑक्सफर्डची व्हॅक्सजेवरिया आणि जॉन्सन अँड जॉन्सनची जेनसेन व्हॅक्सिन यांचा समावेश आहे.

loading image